शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या जागेचे मुळ मालक, खिलारे पाटलांनी केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल…बघा नेमकं काय म्हटलं ते

by Gautam Sancheti
एप्रिल 7, 2025 | 12:16 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20250407 112918 Facebook

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकूळ असताना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये नेले होते. पण, अगोदर १० लाख रुपये भरावे, त्यानंतरच दाखल केले जाईल असा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे महिलेला दुस-या रुग्णालयात उपचारासाठी प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, येथे दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आता या रुग्णालयाच्या मुळ मालक असलेले खिलारे पाटलांची सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायर होत आहे. त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलं ते बघू या….

परवा अतिशय दुर्दैवी दुर्घटना घडली, त्यात हॉस्पिटलची चूक की त्या patient च्या कुटुंबाची असो, खूपच हळहळ झाली. परंतु त्यातून लोकांनी चुकीचे मालक म्हणुन Facebook WhatsApp वर येणा-या पोस्ट सध्या viral होत चालले होते. त्यामुळे गेले दोन दिवसांपासुन गाजत असलेले दिनानाथ मंगेशकर हॅास्पिटल प्रकरणामुळे पुन्हा पुन्हा मी इतिहासामधे जात आहे …….

पुन्हा इतिहासामधे जाऊन “पूर्वी घेतला गेलेला चुकीचा निर्णय पुन्हा सुधारता येऊ शकला असता तर?” हा विचार त्रास देतोय!!! दीनानाथ मंगेशकर हॅास्पिटलच्या जागेसोबत आमच्या लहानपणच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत, एक भावनीक नातं आहे त्या जागेसोबत. माझ्या घरच्या सर्वांचच.
ती ६ एकर जागा आणी त्याच्या बाजूच्या हिमाली आणी संकुल सोसायटी हा पूर्णं पट्टा आमची (खिलारे कुटुंबाची) शेती होती, होय मला आजही आठवतय आमचे काका कै.पै.काशिश्वर ऊर्फ अण्णासाहेब खिलारे व वडिल श्री बाळासाहेब ऊर्फ अप्पासाहेब खिलारे-पाटील हे तिथे १९८६ पर्यंत शेती करत होते. मोठे काका कै.भाऊसाहेब हे राजकारणात असल्यामुळे वेळे अभावी त्यांनी फक्त शेती केली नाही.

आम्ही भावंडे तसे लहान होतो, तिथे काळ्या मातीतील फ्लॉवर, कोबी, काकडी, गहु,भले मोठे ऊसाचे वावर, तिथली विहीर आणि तिथला जागरूक म्हसोबा जिथे आजही आमचे बंधू मंदार आणि युवराज वेळोवेळी जावून स्वच्छता करून नेवैद्य दाखवतात. परंतु आठवणी ताज्या आहेत आणि आता अजून ताज्या झाल्या. माझ्या माहिती नुसार साधारण ३४ एकर एकूण शेती होती आमची, ती त्या काळात म्हणजेच १९८७ साली ceiling कायदा आला किंवा येणार होता. त्याच दरम्यान, लता मंगेशकर या पुणे शहरामधे हॅास्पीटलसाठी जागा शोधत होत्या. तशी इच्छा त्यांनी शरद पवार यांना बोलून दाखवली.

मा.शरद पवार, मा.विलासराव देशमुख हे आमचे काका माजी महापौर कै.दि.ज.खिलारे ऊर्फ भाऊसाहेब यांचे मित्र होते. त्यांचे नेहमीच घरी येण जाण होते,या सर्व गोष्टींची आमचे अनेक नातेवाईक, हितचिंतक, सर्वं खिलारे परिवार साक्षीदार आहेत- शरद पवार यांचा भाऊसाहेब यांना फोन आला की, खिलारेसाहेब कर्वेरोड डेक्कन कॅार्नर ते पौडफाट्याच्या पुढेपर्यंत सर्वं तुमच्या परिवाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या जागा आहेत. त्या पैकी गरवारे कॅालेज, नळस्टॅापचं चर्च, महिलाश्रम, अग्निशामक दल, शासकीय दवाखाना आताचा (थरकुडे दवाखाना) अश्या जवळपास १५ एकर जागा तुमच्या वडिलांनी (जयसिंगराव खिलारे-पाटील) यांनी विनामोबदला दिल्या आहेत. लतादिदी धर्मादाय हॅास्पिटलसाठी जागेच्या शोधात आहेत, एरंडवण्यामधे तुमची शेती आहे त्यातला ६ एकर जागेचा पट्टा दिदींना धर्मादाय हॅास्पीटलसाठी द्यावा.

शरद पवार साहेबांनी करतानाच जाता जाता एक गोष्ट कानावर घातली जी हसत हसत कदाचित विनंती कम धमकी होती….खिलारेसाहेब कर्वेरोडच्या अर्ध्या जमिनींचे मालक तुम्ही आहात पण सिलींगचा कायदा आलेला आहे, जमिनी सिलींगमधे जातील, त्यापेक्षा धर्मादाय हॅास्पीटलसाठी ती जागा द्यावी.
गरवारे कॅालेज, महिलाश्रम, चर्च अशा कितीतरी जागा सिलींगचा कायदा नसताना दान केल्या गेल्या होत्या.

माझ्या धाकट्या आत्याचे आणि मोठ्या बहिणीचे सासरे, मुळशीचे आमदार नामदेवराव मते, आमच्या दुसर्‍या बहिणीचे सासरे माजी खासदार विठ्ठलराव तुपे तसेच अनेक नातेवाईक आणि हितचिंतक यांनी भाऊसाहेब आणि आमच्या वडील आणि पहिलवान काका यांना पुन्हा पुन्हा सांगीतल की तुम्ही खिलारे कुटुंबाने स्वतः तीथे कॅालेज किंवा हॅास्पिटल बांधा..
पण आमच्या खिलारे कुटुंबातील सर्वांनी संमतीने ही जागा विनामोबदला देण्याचे ठरवले, आणि तसा शब्द शरदरावांना दिला. त्यामुळे रोज कोणाचे ना कोणाचे घरी फोन यायचे एवढी मोठी सोन्यासारखी जागा नका देऊ मंगेशकरांना. धर्मादायी हॅास्पिटलच्या नावाने आज तुम्ही जागा द्याल पण भविष्यात तीथे पैशांचा कारखाना सुरू होईल आणी तीच भविष्यवाणी नंतर वेळोवेळी अनुभवात आली..

खिलारे यांचे नाव हॅास्पीटलला द्यावे किंवा एक पूर्णं मजला तुमच्या कुटुंबासाठी नेहमी रिझर्वं ठेवावा असही बरेच जणांनी सुचवल होत. पण दिनानाथ मंगेशकर हॅास्पीटलच्या सुरवाती पासुन शेवटपर्यंतच्या ६ एकर परीसरातील अगदी एखाद्या फरशीवरही आम्हा खिलारेंचे नाव लावून घेतलं नाही. परंतू गोर गरीब पेशंटला ट्रिटमेंटवर ३० टक्के सुट देण्यात यावी ही इच्छा आम्ही बोलून दाखवली होती.

आणी याच गोष्टीमुळे मनापासुन वाईट वाटत जेव्हा या वास्तूमधे पुन्हा पुन्हा पैशांसाठी उपचारांअभावी रूग्णांचे बळी जातात आणि येथे रूग्णांकडून अवाच्यासवा दर आकारले जातात. आमची बहिण वर्षा हिच्या लग्नामधे २० एक हजार लोकांच्या साक्षीने त्या जमिनीतील काळी माती चांदीच्या कलशा मध्ये घालून ३० April १९८९ रोजी लता मंगेशकर यांच्या हातात तो कळश देऊन त्यांनच्या कुटुंबाला जमीन देतानाच्या आठवणी आणि फोटो फक्त राहिले आहेत
हॅास्पीटल बांधलं गेल आणि काही वर्षातच हॅास्पीटल मॅनेजमेंट त्या प्रत्येक घटनेची साक्षीदार मी आहे याची खंत वाटते जेव्हा ईथे कोणाचा नाहक बळी जातो…..

मा.शरद पवारजी यांच्या विनंतीवरून पुणे शहरातील एरंडवणे येथील कोट्यावधी रूपयांची ६ एकर जागा मंगेशकर हॅास्पीटलसाठी देताना माजी महापौर दि.ज. उर्फ भाऊसाहेब खिलारे यांच्या एकत्र कुटुंबाने गरिबांसाठी आपल्या भागामधे एक मोठं हॅास्पिटल बनेल या भावनेतून ही जागा स्वखुशीने कोणत्याही अटी न ठेवता दिनानाथ मंगेशकर हॅास्पीटलसाठी दान दिली होती. माजी महापैार भाऊसाहेब खिलारे यांनी चांदीच्या कलशात जागे वरील माती भरुन ही जागा दान केली होती तरी पण भाऊसाहेब खिलारे यांचे बाय पास ऑपरेशनचे दहा लाख रुपये मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने घेतले हेाते …एवढेच नाही तर ज्यांनी ही जागा दान केली आहे ते आपल्या हॅास्पीटलमधे एडमीट आहेत म्हणुन डॅा. केळकर यांनी रूममधे येऊन भाऊसाहेबांची भेट घेतली होती या भेटीचेही व्हिजीट चार्जॅस बिलामधे लावले होते.

ते पाहुन भाऊसाहेब हसत बोलले होते की या हाताच दान त्या हाताला समजू द्यायच नसत ही आपली नियत आणी ती त्यांची नियत…

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक…पतीने पत्नी व सासूला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न…सिन्नर तालुक्यातील घटना

Next Post

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी गौरव ठक्कर, मानद सचिव म्हणून तुषार संकलेचा यांची निवड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

post
संमिश्र वार्ता

अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित…हे आहे कारण

ऑगस्ट 23, 2025
Untitled 38
महत्त्वाच्या बातम्या

ईडीची मोठी कारवाई…आमदाराला अटक, १२ कोटीची रोख रक्कम व ६ कोटीचे दागिने जप्त

ऑगस्ट 23, 2025
WhatsApp Image 2025 08 22 at 18.17.36
संमिश्र वार्ता

विठू माझा लेकुरवाळा’ने श्रोते मंत्रमुग्ध…२५० बालकलावंतांचा भक्तीचा जागर, रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

ऑगस्ट 23, 2025
प्रातिनिधिक फोटो
इतर

अल्पवयीन मुलीस परिचीताने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

ऑगस्ट 23, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पाच लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

ऑगस्ट 23, 2025
Corruption Bribe Lach ACB
स्थानिक बातम्या

दोन हजाराच्या लाच प्रकरणात सहाय्यक फौजदारासह एक खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

ऑगस्ट 23, 2025
anil ambani
इतर

अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे…बँक कर्ज फसवणूक प्रकरणाचा आरोप

ऑगस्ट 23, 2025
cbi
संमिश्र वार्ता

बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने केली एकाला अटक…

ऑगस्ट 23, 2025
Next Post
APL2853

क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी गौरव ठक्कर, मानद सचिव म्हणून तुषार संकलेचा यांची निवड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011