मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत भाजपला चांगलेच डिवचले आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचे पहायला मिळाले.
दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. आज सकाळीच हे ट्वीट करत दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे.
भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही.
पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) January 13, 2023