नाशिक – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॅामर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापाडिया (७६) यांचे आज पहाटे निधन झाले. अशोका मेडीकव्हर रुग्णालयात ते गेले काही दिवस उपचार घेत होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कापाडिया हे ऑल इंडिया क्लॅाथ मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष सुध्दा होते. त्यांनी रेल्वेच्या विभागीय व झोनल समितीवर सदस्य म्हणून अनेक वर्षे काम केले. त्याचप्रमाणे आयकर उपभोक्ता सल्लागार समितीवर ते अनेक वर्षे होते. रोटरी क्लबच्या मध्यामातून त्यांनी अनेक सामाजिक कामे करत उपक्रम राबवले.
कापडिया यांच्या निधनानंतर प्राचार्य प्रशांत पाटील यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण करतांना सांगितले की, उद्योग व्यवसायाचा वारसा लाभलेले कपाडिया यांनी व्यापार उद्योग आयुष्यभर उत्तमरित्या केला. पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये अध्यक्षपदी त्यांनी काम केले. करन्सी प्रेस मध्ये फार मोठा सप्लायचा त्यांचा व्यवसाय होता. ते अतिशय उत्तम वक्ते ,उमद्या व्यक्तिमत्वाचे धनी होते. प्रत्येक काम अचूकपणे व स्मार्ट पणे करायची त्यांची पद्धत होती. मित्रांसाठी सदैव मदती करता ते तयार असायचे. माझे आणि त्यांचे गेली अनेक वर्ष ऋणानुबंध होते. त्यांच्या जाण्याने माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे. तर भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी श्रध्दांजली अर्पण करतांना सांगितले की, एक अत्यंत हसतं खेळतं व्यक्तीमत्व, व्यापार उद्योगासाठी सतत अग्रभागी असलेले नेतृत्व हरपले.
….
व्यापारी संघटनांची कधीही न भरून निघणारी हानी झाली – पालकमंत्री छगन भुजबळ