मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – राधे श्याम चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे यांची महत्त्वाची भूमिका आहे. बाहुबली चित्रपटाने प्रभास भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार बनला आहे. त्याच्या चित्रपटाची कमाई आमिर खानपेक्षा जास्त आहे. त्याने शाहरुख खान आणि सलमान खानच्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. त्यामुळे तो आता सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून समोर आला आहे. प्रभासचा चित्रपट राधे श्याम 11 मार्चला प्रदर्शित होत आहे. राधे श्यामचे सॅटेलाइट आणि डिजिटल अधिकार एका स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला विकले गेले आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या डिजिटल डीलमुळे देखील चर्चेत आहे. राधे श्यामचे सॅटेलाइट आणि डिजिटल हक्क एका वेगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला विकले गेल्याचे वृत्त आहे. यामुळे हा सौदा अडीचशे कोटी रुपयांमध्ये झाला आहे. एका OTT प्लॅटफॉर्मने राधे श्यामला थेट OTT वर रिलीज करण्यासाठी 400 कोटी रुपयांची ऑफर दिली होती.
राधे श्यामचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. हा चित्रपट युरोपमध्ये चित्रित करण्यात आला आहे. त्यात सन 1970 च्या दशकातील कथा असल्याचे सांगण्यात येते. राधे श्याममध्ये प्रभास विक्रमादित्यच्या भूमिकेत आहे, तो पूजा हेगडे उर्फ प्रेरणा हिच्या प्रेमात पडतो. वास्तविक जानेवारीला रिलीज होणार होता, मात्र कारण कोरोना विषाणूमुळे राधेश्यामची रिलीज पुढे ढकलण्यात आली. राधे श्यामची निर्मिती सुपरस्टार प्रभासने गोपी कृष्णा मुव्हीज, युवी क्रिएशन्स आणि टी-सीरीज यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे. सुपरस्टार प्रभास अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्याच्या चित्रपटांना चांगलीच पसंती मिळाली आहे. तसेच तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. त्यावर अनेकदा त्याचे फोटो शेअर करत असतो.