मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजच्या काळात कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे फोनमध्ये सेव्ह करणेकिंवा घरात ठेवणे थोडे कठीण आहे. कारण तुमचा फोन हरवला आणि चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेला तर तो त्याचा गैरवापर करू शकतो. तसेच ती कागदपत्रे घरी ठेवत असताना, हरवण्याची किंवा चोरी जाण्याची शक्यता असते. ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, कार नोंदणी प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र इत्यादी अधिकृत कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी, या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारने डिजीलॉकर, क्लाउड-आधारित अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रांमुळे तुमची कागदपत्रे सोबत नेण्याऐवजी घरीच ठेवू शकता. तसेच गरज भासल्यास डिजी लॉकरच्या मदतीने दाखवू शकता.
एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले, डिजी लॉकर अॅप वापरकर्त्यांना त्यांचे दस्तऐवज संग्रहित करण्यासाठी 1GB क्लाउड स्टोरेज प्रदान करते. क्लाउड स्टोरेज सुरक्षित आहे कारण ते सर्व माहिती प्रसारित करण्यासाठी 256-बिट सिक्योर सॉकेट लेयर (SSL) एन्क्रिप्शन वापरते.
असे उघडा खाते
– सर्वप्रथम, तुम्ही सरकारी वेबसाइट digilocker.gov.in वर जा.
– आता Signup पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी इत्यादी सर्व आवश्यक माहिती सबमिट करा. -त्यानंतर तुमचा तयार केलेला पासवर्ड टाका.
– तुमच्या दिलेल्या नंबरवर OTP येईल.
– आता तुम्ही OTP किंवा फिंगरप्रिंट पर्याय वापरून प्रक्रिया पूर्ण करू शकता.
– यानंतर तुम्ही तुमचे युजरनेम आणि पासवर्ड तयार करून लॉग इन करू शकाल.
कागदपत्रे अशी करा अपलोड
– डिजी लॉकरवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी, प्रथम DigiLocker अॅप डाउनलोड करून लॉगिन करावे लागेल.
– अॅप डाउनलोड केल्यानंतर, सर्वप्रथम अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि नंतर अपलोड आयकॉनवर क्लिक करा.
-आता, स्थानिक ड्राइव्हवरून फाइल शोधा आणि ती अपलोड करण्यासाठी ‘ओपन’ निवडा.
– अपलोड केलेल्या फाइलचे वर्गीकरण करण्यासाठी ‘सिलेक्ट डॉक टाइप’ वर क्लिक करा. तसेच येथे सर्व कागदपत्रे एकत्र दिसतील.
– त्यानंतर save वर क्लिक करा. तुम्हाला हवे असल्यास, फाइलचे नाव देखील बदलू शकता.