इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या डिजिटलचा जमाना असून सोशल मीडियाचा वापरही वाढला आहे. देशभरात मोबाईल धारकांची प्रचंड प्रमाणात संख्या असून अनेक ॲप्स दररोज मोठ्या प्रमाणावर वापर होतो व्हॉट्सॲपवर युजर्स अनेक सेटिंग्स आणि विविध पर्यायांचा वापर करीत असतात. यावर डिजिटल लॉकर ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्हॉट्सॲपचा वापर लक्षात घेता विविध शासकीय सेवांचे ॲक्सेसदेखील व्हॉटस्ॲपला देण्यात आला आहे. या शिवाय युजर्स वाहतूक नियमांचा भंग होण्यापासून वाचण्यासाठीही व्हॉटस्ॲपचा वापर करु शकतात. अॅपचा वापर प्रामुख्याने महत्त्वाची कागदपत्रं स्टोर करण्यासाठी केला जातो. आता नागरिक MyGov Helpdesk द्वारे WhatsApp च्या माध्यमातून देखील डिजीलॉकर सर्विसचा लाभ घेऊ शकणार आहेत. Digilocker सर्विस अंतर्गत तुम्ही अकाउंट तयार करण्यासोबतच पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, व्हिकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसह इतर महत्त्वाची कागदपत्रे सहज डाउनलोड करू शकता.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सुविधा देण्याचे काम करत आहे. WhatsApp वर MyGov Helpdesk उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना सरकारी सेवांचा त्वरित लाभ मिळण्यास मदत होईल. MyGov Helpdesk अंतर्गत आता सिटीझन सपोर्ट, योग्य सुविधा आणि डिजीलॉक सर्विसचा लाभ घेता येईल.’, असे सांगण्यात आले आहे.
या अॅपमध्ये सर्व नागरिक WhatsApp नंबर +९१ ९०१३१५१५१५ वर मेसेजकरून या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतात. WhatsApp वर MyGov Helpdesk उपलब्ध करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट हे नागरिकांना त्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा अॅक्सेस आणि इतर माहिती थेट फोनद्वारे देणे हा आहे. तुम्ही या सेवेंतर्गत PAN card, Driving License, CBSE १०वीचे प्रमाणपत्र, Vehicle Registration Certificate (RC), दूचाकीची विमा पॉलिसी, १०-१२वीचे प्रमाणपत्र आणि इंश्योरेन्स पॉलिसी डॉक्यूमेंट्स सारखी महत्त्वाची कागदपत्र डाउनलोड करू शकतात.
अनेक जणांना बाइक किंवा कारचे आरसी, इंश्योरेंस आणि पीयूसी नसल्याने वाहतूक पोलिस हे वाहतूक नियमांचा भंग केल्यासंदर्भात दंड आकारु शकतात. व्हॉटस्ॲपवर डिजिलॉकरचा ॲक्सेस करुन पावती फाडण्यापासून युजर्सला वाचता येते. अनेक दुचाकी किंवा कारचालक आरसी, इंशोरेंस किंवा पीयूसी आदी कागदपत्रे घरी विसरुन जात असतात. अशा लोकांसाठी डिजिलॉकर हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.
https://twitter.com/mygovindia/status/1528748854291509248?s=20&t=D5jVD0SRRepq3JrDu1EILw
डिजिलॉकर सर्व्हिसेसचा पर्याय निवडून लायसेंस आणि व्हीकल रजिस्ट्रेशनसारखे कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. सोबत पॅनकार्ड सारखे कागदपत्रेही डाउनलोक करु शकणार आहोत. याच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांना आरसी आणि लाइसेंस दाखवले जाउ शकते. व्हॉट्सॲपवर 2020 मध्ये माय गव्ह हेल्पडेस्कने कोविडशी संबंधित माहितीसह व्हॅक्सिन टाइम टेबल सेट करणे आणि व्हॅक्सिन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी पर्याय दिला होता. आता या प्लॅटफार्मवर विविध पध्दतीचे कागदपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा मिळत आहे.
Digilocker Facility is now available on WhatsApp also How to Use
Technology Tips Important Documents Digital