मुंबई – जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा असतात. त्या बघून किंवा ऐकून आपल्याला आश्चर्य वाटते. ब्रुनेई हा देखील असाच एक देश आहे, तेथील मनोरंजक गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करतात. कारण येथे घराच्या भिंतींवर पत्नीचे छायाचित्र लावण्याची प्रथा येथे आहे. काही घरात तर एकापेक्षा जास्त बायकाची छायाचित्रे देखील दिसतात. याशिवाय देशाचा प्रमुख राजा तथा सुलतान याचे चित्रही भिंतीवर दिसते.
पूर्व आणि दक्षिण आशिया मधील इंडोनेशियात जवळच असलेल्या ब्रुनेई या देशात आजही राजशाही चालू आहे, अर्थात येथे राजाचा कारभार चालतो. तसेच ब्रुनेई हा मुस्लिम बहुल देश आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही या देशातील महिलांना मतदानाचा अधिकार नाही. या देशाच्या राजधानीचे नाव ब्रुनेई टाउन असून या देशातील सर्वात मोठे शहर आहे. जगातील इतर अनेक देशांप्रमाणे हा देश देखील इंग्रजांचा गुलाम झालेला होता. मात्र 1 जानेवारी 1984 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळाले.










