नैनीताल (उत्तराखंड) – कोरोनाच्या संकटाचा मोठा परिणाम विविध क्षेत्रांवर झाला आहे. विवाह समारंभांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अनेक संकटे येऊनही विवाह समारंभासाठी नामी शक्कल लढविली जात आहे. असाच एक विवाह सोहळा सध्या देशभराच चर्चिला जात आहे.
जिल्ह्यातील कोटाबाग भागामध्ये लग्नाच्या काही तास आधी वराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कुटुंबात खळबळ उडाली. जेव्हा वधूच्या नातेवाईकांनी ही माहिती देण्यात आली तेव्हा त्यांना धक्काच बसला. प्रथम सर्वांनी लग्न तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर असे ठरविले की, कोविड मार्गदर्शक नियम पाळून लग्न होईल. मग वरासह संपूर्ण वधू आणि पीपीई किट घालून लग्नात आले. तसेच सर्व विधी कायद्यानुसार पूर्ण करण्यात आले.
कोविड-पॉझिटिव्ह असल्यामुळे वराची मिरवणूक निघू शकली नाही. आता अहवाल निगेटिव्ह आल्यावर वराची वरात निघण्याची तारीख ठरवली जाईल. कोटाबागमधील नाथनगरच्या रुर्कीमध्ये एका व्यक्तीने आपल्या भाच्याच्या लग्नासाठी संपूर्ण तयारी केली होती. लग्नाची आमंत्रणे जवळच्या नातलगांना आणि ओळखींना आधीच वाटली गेली होती. परंतु लग्नाआधी सावधगिरीचा उपाय म्हणून वधूसह संपूर्ण कुटुंबाची कोरोना तपासणी केली गेली. सोमवारी संध्याकाळी वर आणि त्याची लहान बहीण यांचा कोरोना या अहवालात पॉझेटिव्ह आला. यामुळे घरात खळबळ उडाली.
या प्रकरणाची वधूकडच्यांना तातडीने माहिती देण्यात आली. यानंतर लग्नाला आलेल्या पुरोहीतासह एकूण पाच वऱ्हाडींना पीपीई किट घालण्यात आले. मग आरोग्य विभाग आणि पोलिस पथक यांच्या उपस्थितीत लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले. यानंतर मिरवणूक वधू वराबरोबर नैनीतालला परत आली. कोटाबाग रुग्णालयाचे डॉ. मंगल बिष्ट यांनी सांगितले की, वराचा कोरोना सॅम्पलिंगचा अहवाल पॉझेटिव्ह आला होता. याची त्यांना माहिती दिली. वधू-वर या दोघांनाही संपूर्ण मार्गदर्शक सूचनांसह पीपीई किट घालून लग्न केले.