मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात टीम इंडियाच्या एका फॅनने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याचा व्हिडीओ आयसीसीने (ICC) त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही पोस्ट केला आहे. या तरुणाने तरुणीला प्रपोज केल्यावर तिने होकार दिल्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा ठरला आहे. या व्हिडिओला ‘ती हो म्हणाली’ असे कॅप्शनही दिले आहे.
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये सुरु असलेल्या या भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यात हा सामना मोठ्या धावसंख्येच्या फरकाने भारताने सामना जिंकला आहे. भारताने सुरुवातीला १७९ धावा केल्या. त्यानंतर नेदरलँड संघाला १२३ धावांत गुंढाळले. त्यामुळे एकतर्फी झालेल्या या सामना फार चर्चेत नसला तरी हा व्हिडिओमुळे हा सामना चांगलाच चर्चेत आला आहे.