पुणे – इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. व्हॉट्सअॅपचे इंटरफेस साधे आणि सरळ असून, त्यामध्ये आपल्याला अनेक आवश्यक फिचरही मिळतात. त्यामुळे टेक्स्ट मेसेज पाठविण्याऐवजी व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठविणे आपण जास्त पसंत करतो. ज्यांना मोबाईल नंबर दाखविण्याची इच्छा नाही अशा युजर्सना आपल्याला अनेकदा मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवावा लागतो. मेसेज पाठवू शकतो असे फिचर व्हॉट्सअॅपवर सध्या उपलब्ध नाहीय. परंतु दोन पद्धतींद्वारे फोन नंबर दिसू न देता मेसेज पाठवता येऊ शकतात. तर चला जाणून घेऊयात ते कोणत्या पद्धती आहेत.
लँडलाइन नंबरचा वापर
व्हॉट्सअॅपवर लँडलाइन नंबरवर नोंदणी करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा क्लोन बनवावा. व्हॉट्सअॅपच्या क्लोनवर लँडलाइन नंबर नोंदवावा. त्यावरून ओटीपी प्राप्त करून घेण्यासाठी कॉल मी पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ओटीपी एंटर करावा. याद्वारे लँडलाइन नंबर व्हॉट्सअॅपवर सेव्ह होईल. त्यानंतर मोबाईल नंबर न दिसू देता तुम्ही मेसेजेस पाठवू शकाल.
व्हर्च्युअल किंवा टेम्प्ररीचा वापर
तात्पुरता किंवा व्हर्च्युअल नंबरच्या मदतीने तुम्ही तुमचा खरा नंबर लपवू शकतात. त्यासाठी टेक्स्ट नाऊ आणि व्हर्च्युअल फोनसारख्या सेवांचा वापर करू शकतात. व्हॉट्सअॅपने काही महिन्यांपूर्वी डिसअॅपिअरिंग मेसेजेस फिचरचे अनावरण केले होते. व्हॉट्सअॅपवरील मेसेज सात दिवसांनंतर आपोआप डिलिट होण्याची ती व्यवस्था करण्यात आली आहे.