विशेष प्रतिनिधी, मुंबई
सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाने आपला फोटो शेअर करत चाहत्यांना चांगलेच गोंधळात टाकले. तिचा हा फोटो पाहून, चाहत्यांना तिची काळजी वाटून, तिची विचारपूस करणारे मेसेज सोशल मीडियावर पडू लागले.
दियाच्या या फोटोन तिला हाताला आणि चेहऱ्याला जखमा दिसत आहेत. आणि ती खुर्चीमध्ये शांतपणे मेडिटेशन करताना बसलेली दिसते. हा फोटो पडायचा अवकाश, की नेटकऱ्यांनी प्रश्न विचारून तिला भंडावून सोडले. अखेर दियाने या फोटोची खरी कहाणी सांगितली. एका डोंगराळ प्रदेशात ती बसली आहे. ती म्हणते, मेडिटेशन ही खूप प्रभावी गोष्ट आहे. यातील सातत्याने तुमचे आयुष्यच बदलून जाईल. ही गोष्ट वेळेत लोक समजून घेतील, तर त्यांचे निश्चितच भले होईल, असेही दिया म्हणते. त्यामुळेच मेडिटेशन हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. वर्ल्ड मेडिटेशन डे निमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे.
तिच्या चेहऱ्यावरील जखमा खऱ्या नसून काफिर या २०१९ मधील वेबसिरीजमधील बिहाईंड द सीन फोटो आहे. याबाबत दियाने या फोटोसोबतच एक नोटही पोस्ट केली होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारून तिच्या तब्येतीची चौकशी केली.
दिया मिर्झा सध्या आपला प्रेग्नन्सीचा काळ एंजॉय करते आहे. वास्तिवक, तिचे लग्न झाले तेव्हाही ती प्रेग्नंट होती. पण, याबद्दल तेव्हा कोणीच काही कल्पना दिली नाही. याबाबत दिया सांगते, मी प्रेग्नंट असल्याने आम्ही लग्न केले नाही. तर आम्हाला एकमेकांसोबत रहायचे असल्याने आम्ही लग्न केले आहे. या लग्नाच्या तयारीत असतानाच नवीन पाहुण्याची चाहूल लागली होती. आणि याबद्दल आधी न सांगण्याचे कारणही दियाने स्पष्ट केले आहे. वैद्यकीयदृष्ट्या सगळं ठीक आहे ना, हे पाहून मगच याबाबत बोलायचे आम्ही ठरवले होते. त्याप्रमाणे डॉक्टरांकडून मान्यता मिळाल्यावर आम्ही ही बातमी सगळ्यांना सांगितली.