मुंबई – अभिनेत्री दिया मिर्झा हिने बाळाला जन्म दिला आहे. तशी माहिती तिनेच तिच्या सोशल मिडिया अकाऊंटद्वारे दिली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात तिने उद्योजक वैभव रेखी यांच्याशी लग्न केले आहे. दिया आणि वैभव या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. गेल्या मे महिन्यात तिने बाळाला जन्म दिल्याचे म्हटले आहे. बाळाचा फोटो आणि एक पोस्ट तिने शेअर केली आहे. लग्न करतेवेळीच ती प्रेग्नंट असल्याचे तिने स्पष्ट केले होते. बाळाचे नाव तिने अव्याद आजाद असे ठेवले आहे. गर्भवती असतानाच मला मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. सुदैवाने डॉक्टर आणि सर्वांनी अथक प्रयत्न केल्याने मी व बाळ सुखरुप आहे. गंभीर संसर्गापासून मी मुक्त झाले आहे. २०१४ मध्ये दियाने साहिल संघाशी लग्न केले होते. गेली अनेक वर्षे त्यांची मैत्री आणि व्यावसायिक भागीदार ते होते. पाच वर्षे ते सोबत राहिले. २०१९ मध्ये तिने साहिल सोबत घटस्फोट घेतला. २०२० मध्ये वैभव आणि दिया दोघांचीही मैत्री झाली. लॉकडाऊनमध्येही ते सोबतच होते. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारीत विवाह केला.
दिया मिर्झाने शेअर केलेली पोस्ट अशी