धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातबारा तयार करून देण्याचे मोबदल्यात लाच प्रकरणात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील तलाठी, संगणक ऑपरेटर व कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. या प्रकरणी लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे.
या कारवाई बाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिलांचे व भावाचे नावाने रोजगाव ता.साक्री जि.धुळे येथील शिवारात सर्वे क्र.155/62 व 155/63 या शेतीचे खातेफोड करून तीन्ही भावांचे नावाने सातबारा तयार करून देण्याचे मोबदल्यात एकूण ४० हजार रूपयाची लाचेची मागणी करून स्वतः तक्रारदार यांचेकडून १० हजार व मार्च-२०२३ मध्ये तक्रारदार यांचे वडिलांकडून १० हजार असे एकूण २० हजार रूपये काम करून देण्याचे मोबदल्यात अगोदरच घेतले.
त्यानंतर १८ एप्रिल २०२३ रोजी तक्रारदार यांनी ला.प्र.वि. नंदुरबार कार्यालयात तक्रार दिलेनंतर पंच साक्षीदारासमक्ष पडताळणी केली असता तलाठी श्रीमती ज्योती पवार यांनी खातेफोड करून देण्याचे मोबदल्यात उर्वरित २० हजार रुपयाची ची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानंतर त्याच दिवशी तक्रारदार हे श्रीमती पवार यांना लाचेची रक्कम देण्यास गेले असता त्या मिळून आल्या नाहीत, परंतू नमूद कार्यालयातील संगणक ऑपरेटर आरोपी योगेश सावळे यांनी तक्रारदार यांना पैसे आणलेत का ? विचारून लाचेची मागणी केली तसेच २९ मे २०२३ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान यातील योगेश सावळे व छोटू जाधव (कोतवाल, सजा-जैताणे) यांनी श्रीमती ज्योती पवार यांनी सांगितलेवरून जैताणे येथील तक्रारदार यांचे राहते घरी लाचेची रक्कम घेण्याकरीता जावून पुन्हा पंच साक्षीरांसमक्ष लाचेची मागणी केली, म्हणून त्यांचेविरूद्ध निजामपूर पोलीस स्टेशन, ता.साक्री, जि. धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
लाचखोरांची नावे
१) श्रीमती ज्योती के. पवार, वय-35 वर्षे, व्यवसाय-नोकरी (तलाठी, सजा- रोजगाव) ता.साक्री, जि.धुळे. (वर्ग-3) रा.निजामपूर ता.साक्री जि.धुळे (सध्या नेमणूक-मंडळ अधिकारी, तामथरे मंडळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे)
२)* श्री योगेश कैलास सावडे, वय-25 वर्षे, व्यवसाय-संगणक ऑपरेटर सजा-रोजगाव, रा. उमर्डी, ता.साक्री, जि.धुळे.
3)* श्री छोटू भिकारी जाधव, वय-45 वर्षे, व्यवसाय-नोकरी (कोतवाल, सजा-जैताणे) रा. जैताणे, ता. साक्री, जि.धुळे.
पर्यवेक्षण अधिकारी:-
*श्री राकेश आ. चौधरी, पो. उपअधीक्षक, ला.प्र. वि. नंदुरबार,मो. नं.9823319220
*सापळा अधिकारी:-
श्री. समाधान महादू वाघ,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि., नंदुरबार
सह सापळा अधिकारी :- श्रीमती माधवी एस वाघ,ला. प्र. वि., नंदुरबार
सापळा कार्यवाही पथक:-
पोहवा/ विजय ठाकरे, पोहवा/ज्योती पाटील, पोना/मनोज अहिरे, पोना/देवराम गावित, पोना/संदीप नावाडेकर व पोना/अमोल मराठे सर्व नेम. ला.प्र.वि. नंदुरबार.
मार्गदर्शक:-
1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 93719 57391
2) मा.श्री.माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9404333049.
3) मा.श्री.नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9822627288
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, जयचंद नगर, नंदुरबार.*
दूरध्वनी क्रं. ०२५६४-२३०००९
टोल फ्रि क्रं. 1064