बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धुळे प्रकरणात एक अधिकारी निलंबित, विश्रामगृहाच्या रुममध्ये मिळाले इतक्या नोटांचे बंडल

by India Darpan
मे 23, 2025 | 7:35 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 42


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क

जिल्हा धुळे येथे विधीमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना विधिमंडळाचे संशयित कक्षअधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले असून , संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात येत असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली. या प्रकरणात विधिमंडळ १ कोटी ८४ लाख ८४ हजार दोनशे रुपये जप्त करण्यात आले. शासनाच्या अंदाज समितीतील ११ आमदार धुळ्यात आले असून त्यांना देण्यासाठी पाच कोटी रुपये विश्रामगृहात आणण्यात आल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा तसेच विकास कामांचे अंदाजपत्रक सादर करण्याकरता महाराष्ट्र राज्य विधिमंडळ आमदारांची समिती तीन दिवसाच्या धुळे जिल्हा दौऱ्यावर आली असता या समितीने धुळे जिल्ह्यातील विविध विभागांच्या प्रशासकीय बैठकांसाठी धुळे शहरापासून तब्बल पाच किलोमीटर दूर असलेल्या अलिशान हॉटेल टॉप लाईन मध्ये पंचतारांकित व्यवस्थेत बैठका घेतल्या यासाठी धुळे जिल्हा प्रशासन तसेच

प्रशासनातील कर्मचारी झाडून पुसून उपस्थित होते, सकाळी सुरू झालेल्या या बैठका दुपारपर्यंत सुरू असताना या ठिकाणी अधिकाऱ्यांसह कर्मचारी व आमदार आमदारांसोबत आलेले त्यांचे स्वीय सहायक यांना स्वादिष्ट व रुचकर भोजनाचा आनंद हॉटेल टॉप लाईन मध्ये घेता आला. एकीकडे या बैठका सुरू असताना धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुलमोहर येथील शासकीय विश्रामगृहात रूम नंबर १०२ मध्ये या समितीचे अध्यक्ष आमदार यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या वतीने काही महत्त्वाच्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसोबत धुळे जिल्ह्यातील विविध विभागातील प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करण्याचे काम बिनोबा भाट पद्धतीने कोणालाही न घाबरता अगदी बिनधास्तपणे सुरू होते. एकीकडे बैठका सुरू असताना दुसरीकडे गुलमोहर विश्रामगृहात शासकीय वाहनातून अधिकारी पैशांच्या नोटांचे बंडल भरलेले ट्रॅव्हलिंग बॅग या रूम नंबर १०२ मध्ये व तसेच गुलमोहर विश्रामगृहाच्या आरक्षित करण्यात आलेल्या सूटमध्ये जमा करून जात होते.

दुपारपर्यंत हे कलेक्शन गोळा करण्याचे काम अगदी बिनधास्तपणे सुरू असताना धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे व उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांना याबद्दलची माहिती मिळाल्यावर त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे महानगरप्रमुख धीरज पाटील यांना ही गोष्ट कानावर घातली. महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी सर्व शिवसेना पदाधिकारी यांना तातडीने संपर्क साधून गुलमोहर विश्रामगृहात जमावयास सांगितले. तोपर्यंत सायंकाळी पाच वाजेपासून माजी आमदार अनिल गोटे यांनी गुलमोहर विश्रामगृहातील रूम नंबर १०२ चा ताबा घेऊन त्या ठिकाणी ठिय्या नरेंद्र परदेशी व पदाधिकाऱ्यांसोबत मांडला.

या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक निवासी उपजिल्हाधिकारी तसेच अँटी करप्शन ब्युरो यांना सूचित देखील केले पोलीस अधीक्षकांनी लवकरच येतो असे सांगून येण्यास टाळाटाळ केली, तोपर्यंत त्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व धुळेकर नागरिकांची गर्दी जमा झाली, तब्बल सहा तास माजी आमदार अनिल गोटे शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील, यांच्यासह पदाधिकाऱ्यांसह ठिय्या मांडला, या कारवाई संदर्भात प्रशासन टाळाटाळ करत असताना माजी आमदार अनिल गोटे, नरेंद्र परदेशी, एड. भूषण पाटील,धीरज पाटील यांनी विविध अधिकाऱ्यांना मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करून माहिती दिली. धीरज पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना मेसेज करून माहिती दिल्यावर खासदार संजय राऊत यांनी तातडीने अनिल अण्णा गोटे यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेत त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून घडलेल्या प्रकाराबाबत ट्विट केले, त्यांच्या या ट्विट नंतर प्रशासन खडबडून जागे झाले.

रात्री साडेदहाच्या सुमारास प्रशासनातील अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंता, महसूल विभागाचे अधिकारी यांच्या नेतृत्वात शासकीय पंच व तसेच तक्रारदार पंच म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांच्या उपस्थितीत रूम नंबर १०२ चे कुलूप कटरने तोडून आत मध्ये प्रवेश करून या रूमची झाडाझडती घेतली. या ठिकाणी नव्याने विकत घेतलेल्या ट्रॅव्हलिंग बॅग तसेच रिकाम्या झालेल्या पाच ते सात ट्रॅव्हलिंग बॅग आढळून आल्या त्यानंतर या रूम मधील कपाट चेक केल्यानंतर एक संपूर्ण कपाट भरून प्लास्टिकच्या काळात थैलीमध्ये नोटांचे बंडलच्या बंडल रचून ठेवण्यात आल्याचे अधिकारी व पंचांना आढळून आले. नोटांचे भले मोठे बंडल आणि थप्प्या पाहून अधिकाऱ्यांनी लागलीच नोटा मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशीन मागवले रात्री अकरा वाजता नोटा मोजायला सुरुवात झाल्यावर रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत या नोटा मोजण्याचे काम सुरू होते शेवटी तब्बल १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० इतकी रक्कम या ठिकाणी मोजण्यात आली.

या सर्व रकमेचे बंडल तयार करून तसेच पंचनामा करून स्वतःचा पंचनामा टाईप करून पहाटे साडेचार वाजता अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत नोटांच्या पाकिटांना व रूम नंबर १०२ ला सिल पॅक करण्यात आले यानंतर पोलीस प्रशासनाने हे सर्व पैसे पोलीस विभागाकडे तीन-तीन भल्या मोठ्या ट्रॅव्हलिंग बॅग मधून पोलीस अधीक्षक कार्यालयात नेले,

सदरचा प्रकार गुलमोहर विश्रामगृह येथे सुरू असताना विधिमंडळ आमदारांच्या समितीत आलेले आमदार या समितीचे अध्यक्षांसह सर्वांनी हळूहळू धुळे जिल्ह्यातून धुळे शहरातील ऑफलाईन हॉटेल मधून विविध मार्गाने पळ काढला. या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील टोल तसेच सोलापूर धुळे महामार्गावरील टोल व सुरत महामार्गावरील टोल वरील सीसीटीव्ही कॅमेरा चे फुटेज देखील प्रशासनाने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली. तसेच गुलमोहर विश्रामगृहातील सीसीटीव्हीचे फुटेज आदल्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपासून तर घटनेच्या कालावधीपर्यंत म्हणजे पंचनामा पूर्ण होईपर्यंत पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावी अशी अशी मागणी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’…महसूलमंत्री यांनी दिले हे निर्देश

Next Post

आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

Next Post
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

आपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

ताज्या बातम्या

Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011