अक्षय कोठावदे, धुळे
धुळे- एसटी महामंडळमधील चालक पदावर कार्यरत असलेल्या कमलेश बेडसे (वय ४५) या कर्मचा-याने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करतांना बेडसे यांनी सुसाईट नोट लिहली असून त्यात एसटी महामंडळाला जबाबदार भरत धरले आहे. या आत्महत्येनंतर नातेवाइकांनी व सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत साक्री डेपो बंद केला. एसटी महामंडळास जबाबदार धरत आत्महत्या ग्रस्त कर्मचार्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत एसटी महामंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला.
कोरना प्रार्दुभावानंतर राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. यामुळे एसटी कर्मचा-यांच्या अडचणीत सापडले आहेत. वेळेवर पगार न मिळाल्यामुळे बेडसेही अडचणीत आले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या आत्महत्येनंतर एसटी कर्मचारी संघटना देखील आक्रमक झाल्या आहे. कुठल्याही प्रकारची बस डेपोतून बाहेर न जाऊ देण्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. वेळेवर पगार होत नसल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. तशी सुसाईट नोट चालक बेडसे यांनी लिहून ठेवली आहे. वेळेवर पगार होत नसल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आपले जीवन संपविले आहे, अशी स्थिती कोणाची होवू नये अशी मागणी एसटी कर्मचा-यांनी केली आहे.