धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील कापडाच्या मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे अनेक दुकाने भक्षस्थानी सापडली आहे. दरम्यान आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाचकंदील परिसरातील कापडाच्या शंकर मार्केटला आग लागली आहे. पहाटेच्या सुमारास आगीच्या भडका उडाला. कापडांची दुकाने असल्यामुळे पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. मार्केटमधील इतर दुकानेही आगीच्या भक्षस्थानी सापडली आहे.
मार्केटला लागलेल्या आगीचे दाह आजूबाजू्च्या परिसरात जाणवत आहेत. धुराचे लोट दूरपर्यंत दिसत आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग विझवण्यासाठी महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागही प्रयत्न करत आहे. बाजारपेठ जुनी असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत. अरुंद जागा असल्यामुळे अग्निशमन दलाला अडचणी येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!