नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील अतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून, हे प्रकरण मुन्नाभाई चित्रपटासारखे असल्याचे वकिलांनी म्हणले आहे. याशिवाय, या मेडिकल कॉलेजमध्ये अचानकपणे तपासणी करण्यात आली असता, तपासणीत कॉलेजमध्ये दाखल असलेले रुग्ण तंदुरुस्त आढळून आले. तसेच बालरोग वॉर्डातही एकही गंभीर रुग्ण आढळून आला नाही.
नॅशनल मेडिकल कमिशनने न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाला सांगितले की, कॉलेजमध्ये ऑपरेशन थिएटर आणि एक्स-रे मशीन नसल्यामुळे अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची परवानगी रद्द करण्यात आली होती. मुन्नाभाई एमबीबीएस या हिंदी चित्रपटासारखी परिस्थिती या कॉलेजमध्ये आहे. वॉर्डातील सर्व रुग्ण तंदुरुस्त व निरोगी असून, बालरोग वॉर्डातही कोणी गंभीर रुग्ण नव्हते. कॉलेजची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, महापालिकेने सूचना न देता तपासणी केली आणि तीही मकर संक्रांतीच्या सुट्टीच्या दिवशी. यावर खंडपीठाने मकर संक्रांतीला आजार थांबत नसल्याचे उत्तर दिले. मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला कॉलेजची नव्याने तपासणी करण्याचे निर्देश दिले होते आणि कॉलेजला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास परवानगी दिली होती. मात्र, एनएमसी कायद्यातील तरतुदींची दखल न घेता हा उच्च न्यायालयाने हा आदेश जारी केल्याच्या कारणावरून महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवत या प्रकरणाचा नव्याने विचार करण्यास सांगितले आहे.