निलेश गौतम
सटाणा – भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने धुळे लोकसभा मतदारसंघातील ५ रस्त्यांच्या कामांसाठी ९३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ सुभाष भामरे यांनी दिली आहे.धुळे लोकसभा कार्यक्षेत्रातील अनेक रस्ते वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिल्याने या रस्त्यासाठी सततचा पाठपुरावा केल्याने या रस्त्यांना ९३९ कोटी रुपये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार भामरे यांनी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने कुसुंबा -मालेगाव बायपास या रस्त्यासाठी १५.५ कोटी मालेगाव – लामकनी- दोंडाईचा -निमगुळ -सारंखेडा ते -शहादा या रस्त्यांसाठी २९० कोटी साक्री- पिंपळनेर सटाणा देवळा चांदवड या रस्त्यांसाठी २४२ कोटी तर मालेगाव कुसुंबा दोंडाईचा या नव्या रस्त्यासाठी ६० कोटी रुपये खासदार डॉ सुभाष भामरे यांनी मंजूर झाल्याची माहिती दिली आहे. या रस्त्यांच्या विकास कामांसाठी भरीव निधी दिल्याने डॉ सुभाष भामरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. या रस्त्यांच्या विकासामुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील जोड रस्त्यांना बळकटी येऊन विविध जिल्ह्यांमधून जाणाऱ्या महामार्गांना हे रस्ते जोडले जाणार आहेत. याबाबत नुकताच बांधकाम अभियांत्याना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत मंजुरी आदेश आला असून सदर रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने वर्षानुवर्षे रखडलेली ही रस्ते पूर्ण होणार आहेत. लवकरच प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामाना सुरुवात होऊन गुणवत्तापूर्ण कामे करण्यात येऊन जनतेच्या सेवेत लवकरच हे रस्ते सुरू होतील अशी माहिती खासदार डॉ सुभाष भामरे यांनी दिली आहे.