शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पावसाची ओढ… धुळे जिल्ह्यात टंचाई, पिके आणि पाण्याची अशी आहे गंभीर स्थिती… पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश…

सप्टेंबर 5, 2023 | 2:50 pm
in राज्य
0
girish mahanjan e1704470311994

धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुळे जिल्ह्यातील काही महसूल मंडळात मागील २१ ते २३ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करुन पिक विम्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही जलदगतीने करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्य सरकारच्या सर्व समावेशक प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील २ लाख ४६ हजार ८४७ शेतकऱ्यांनी १ रुपया भरून कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका आदि पिकांचा पिक विमा काढला आहे. पिक विम्याच्या शासन निर्णयानुसार प्रतिकूल हवामान परिस्थिती (Mid Season Adveristy) च्या निकषांनुसार २५ टक्के नुकसान भरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील पावसाचा अहवाल संकलित करून धुळे जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने (2.5 मी.मी पेक्षा कमी पाऊस पडल्याने) संबंधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्व्हेक्षणाबाबत 25 टक्के अग्रिम स्वरूपात नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीनी जलदगतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे कृषी विभाग, महसूल विभाग व संलग्न सर्व विभाग यांनी पाऊस लांबला असल्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन शेती पिकांच्या नुकसानीबरोबर, जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी कार्यवाही करावी. तसेच सद्यस्थितीत धरणातील आरक्षित पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच अवैधरित्या पाण्याचा उपसा थांबविण्यासाठी तहसिलदार, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, पाटबंधारे विभागातील अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मधील अधिकारी यांचे गस्तीपथक नेमून तालुकास्तरावर टंचाई निवारण समित्यांनी नियमित बैठका घेणेबाबत देखील निर्देश देण्यात यावेत. शेतीच्या नुकसानीच्या सर्व्हेक्षणाबरोबरच संभाव्य टंचाई परिस्थिती संदर्भात शासनस्तरावरून योग्य ते सहकार्य केले जाईल असेही पालकमंत्री श्री. महाजन यांनी सांगितले आहे.

अशा आहेत उपाययोजना
धुळे जिल्ह्यात आजअखेर 268.5 मि.मी. म्हणजे वार्षिक सरासरीच्या 61.5 टक्के इतका पाऊस झाला आहे. आज रोजी धुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये 228.104 दलघमी (46.88 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी 345.23 दलघमी (70.96 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक होता. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी आजअखेर 49 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून मौजे धावडे, ता. शिंदखेडा येथे 1 शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 शासकीय टँकर सुरु असून त्याव्यतिरिक्त 4 टँकर सुस्थितीत तयार आहेत. परंतु भविष्यात टँकर लागण्याची शक्यता लक्षात घेवून खाजगी टँकरसाठी निविदा मागविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे व ज्या ठिकाणी संभाव्य पाणीटंचाईची शक्यता आहे अशा गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्ताव तातडीने पूर्ण करणेबाबत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून वैरण विकास योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे कार्यालयास रक्कम रु. 20 लाख उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

जिल्ह्यात 1 हजार 306 हेक्टरवर अंदाजे उत्पादित होणारा चारा 53 हजार 407 मे. टन असून अर्थे, ता. शिरपूर येथे 500 मे.टन मुरघास तयार होत आहे. खरीप पेरणी क्षेत्रातून उत्पादित होणारा चारा 23 लाख 60 हजार 793 मे.टन आहे. जिल्ह्यात एकूण उत्पादित होणारा चारा 5.5 महिने पुरेल इतका असून जिल्ह्यातील चाऱ्यांची मासिक गरज 4.48 लक्ष मे.टन इतकी आहे.

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2023 च्या मार्गदर्शक सुचनांनुसार पावसाने खंड दिल्यामुळे उभ्या पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असल्याने उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट होणार असल्याने नुकसान भरपाईच्या प्रमाणत विमाधारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येते. त्याअनुषंगाने जेथे पर्जन्यमान कमी झाले आहे व पावसाचा खंड आहे अशा मंडळामध्ये कृषी विभाग व संबंधित कंपनीचे अधिकारी यांचेमार्फत पिकांचे सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात येत असून अहवाल प्राप्त होताच त्याअनुषंगाने अधिसूचना निर्गमित करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याचेही श्री. महाजन यांनी कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा… बघा, कुणाला संधी, कुणाला डच्चू..

Next Post

जळगावच्या केळी उत्पादकांना मोठा दिलासा… या रोगासाठी प्रथमच मिळणार भरपाई… १९ कोटी रुपये मंजूर…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
banana farm e1689949159943

जळगावच्या केळी उत्पादकांना मोठा दिलासा... या रोगासाठी प्रथमच मिळणार भरपाई... १९ कोटी रुपये मंजूर...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011