धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सत्ताही लोहचुंबकासारखी असते, असे म्हटले जाते. कारण जिकडे सत्ता तिकडे राजकीय नेते आणि पदाधिकारी खेचले जातात, सध्या केंद्रात भाजपची सत्ता असून राज्यात देखील शिवसेनेतून बाहेर पडलेले पडलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी एकदा सत्तेमध्ये अर्धा वाटा भाजपचा आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील राजकीय नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. तर काही भाजपमध्ये दाखल होत आहेत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषतः शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे, असे असताना धुळे जिल्ह्यात मात्र उलटे गणित झाले आहे, भाजपमधील एक युवा पदाधिकारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात दाखल झाला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते, धुळ्याचे माजी आमदार तसेच धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे त्यांचे पुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्रीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यशवर्धन यांनी शिवबंधन बांधले आहे. खरे म्हणजे गेल्या काही वर्षात धुळ्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू हे कायमच राजवर्धन कदमबांडे यांच्या भोवती राहिले असून गेल्या अनेक वर्षांपासून कदमबांडे यांचे राजकीय क्षेत्रात दबदबा राहिला आहे.
विशेष म्हणजे यापुर्वी दोन टर्म धुळे शहराचे आमदार राहिलेल्या राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच . राजकारणाला सुरुवात केली होती. यानंतर सन २०१९ मध्ये राष्ट्रवादीमधून बाहेर पडत त्यांनी प्रवेश केला, त्यांचे चिरंजीव यशवर्धन कदमबांडे हे देखील भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी होते. परंतु मात्र अचानक त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने धुळे जिल्हयाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणून राजवर्धन कदमबांडे यांच्या घराण्याची ओळख आहे, वडिलांबरोबर यशवर्धन देखील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे.
सध्या ते भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे एक सक्षम पदाधिकारी म्हणून कार्य करीत होते. धुळ्याच्या राजकारणात त्यांनी वर्चस्व निर्माण केले असून आता त्यांचे शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पक्षाचे पारडे जड होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांच्या हस्ते शिवबंधन बांधून छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य यशवर्धन राजवर्धन कदमबांडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/EwgBd8dAe2
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) October 19, 2022
Dhule District Politics Change BJP Shivsena
Rajvardhan Kadambande