धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अकरा दिवसापूर्वी धुळे शहरातील एका कुटुंबातील दोन मुलांसह पती -पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी विविध कॅाल्स व मेसेज यांची तपासणी केल्यानंतर मृत प्रवीण गिरासे यांच्यावर खुनाला गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर पत्नी व दोन मुले यांचा मृत्यू हा विष प्रयोगाने झाला नसून एकाच दोरखंडाने गळफास देऊन झाल्याचा अहवाल समोर आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांना घराच्या झडतीत सुसाईट नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये आम्ही सर्वजण आत्महत्या करीत असून आमच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही असे नमूद केले आहे. पण, ही सुसाईड नोट पाहिल्यानंतर नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
पोलिसांनी वर्तवला होता संशय
अकरा दिवसापूर्वी धुळे येथील प्रमोद नगर भागातील ही घटना उघडकीस आली. मुलाच्या अॅडमिशनसाठी मुंबईता जात असल्याचे शेजारच्यांना गिरासे यांनी सांगितले. पण, त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यामुळे सर्वांना धक्का बसला. प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे, मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असे मृतांची नावे आहे. प्रवीण गिरासे यांची बहीण सकाळी त्यांच्या घरी आली तेव्हा. घरचा दरवाजा वरच्यावर लावला होता. तसेच घराच्या आजुबाजूला दुर्गंधी येत होती. तिने दरवाजा उघडला तेव्हा पहिल्या मजल्यावर प्रवीण गिरासे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तर बेडरुममध्ये गिरासे यांची पत्न दीपा आणि मितेश व सोहमचा मृतदेह होता. या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता.
खते बि- बियाणे विक्रीचे दुकान
गिरासे यांचे धुळे शहरात खते बि- बियाणे विक्रीचे दुकान आहे. तसेच मितेश व सोहम दोन्ही मुलेदेखील हुशार होते मितेश हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तर सोहम अकरावीला होता. दीपा गिरासे या महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. आर्थिकदृष्ट्या सुध्दा गिरासे कुटुंब सक्षम होते. त्यामुळे ते आत्महत्या करु शकत नाही असा दावा नातेवाईकांनी केला होता. आता पोलिस तपासात या घटनेचा उलगडा झाला आहे.