धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील लाचखोर कन्सल्टंट सिव्हिल इंजिनिअर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला आहे. एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यासाठी तो एंजट म्हणून काम करीत होता. आणि त्यासाठीच त्याने २५ हजार रुपयांची लाच मागितली. अहमद वहा अहमद हसन अन्सारी असे या लाचखोराचे नाव आहे. त्याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे MIDC अवधान धुळे येथील भूखंडावर वाढीव बांधकाम मंजूरीचे काम कार्यकारी अभियंता एमआयडीसी धुळे यांचेकडे प्रलंबित होते. त्यासाठी आरोपी इसम यांनी एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर त्यांचा प्रभाव वापरून तक्रारदार यांचे काम करून देण्यासाठी एमआयडीसी धुळे कार्यालयातील अधिकारी यांचे करिता तक्रारदार यांचेकडे २६ हजार रुपयाची लाचेची पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम एमआयडीसी धुळे कार्यालयाजवळ स्वीकारताना रंगेहात मिळून आला. त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई अहवाल असा
लाचखोराचे नाव – अहमद वफा अहमद हसन अन्सारी, व्यवसाय- consultant civil engineer वय – 32 वर्ष, इस्लामपूरा शाळा नं 10 जवळ, धुळे.
पर्यवेक्षण अधिकारी
मा. श्री अभिषेक पाटील, पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
सापळा अधिकारी:-
हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक. ला.प्र. वि. धुळे. मो.नं. 9405993599
सापळा पथक –
पो नि रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, शरद कटके, पोशि संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, चालक पोहवा सुधीर मोरे, सर्व लाप्रवि धुळे.
मार्गदर्शक
मा.शर्मिष्ठाजी घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मो. नंबर- 9371957391
श्री माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक. मो. नंबर- 9404333049
श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो. नंबर 9822627288
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
टोल फ्रि क्रं.1064
A civil engineer was found red-handed while accepting a bribe of 25 thousand for an officer of MIDC
Dhule Crime MIDC ACB Bribe Corruption Trap