धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेत जमीनीची कौंटुंबिक वाटणी करुन देण्यासाठी ७ हजाराची लाच मागणारा मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. साक्री तालुक्यातील जैताणे येथील मंडळ अधिकारी विजय वामन बावा असे या लाचखोराचे नाव आहे. याप्रकरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या कारवाईबाबत एसीबीने सांगितले की, एका शेतकऱ्याची मौजे भामेर ता.साक्री येथे गट न.43 ,44 अशी शेत जमीन आहे. या शेत जमिनीची कौंटुंबिक वाटणी करावयाची आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने जैताणे मंडळ अधिकारी विजय बावा याची १६ जून रोजी भेट घेतली. त्यावेळी त्याने शेतकऱ्याकडे १८ हजार रुपयाची मागणी केली. तडजोडी अंती १५ हजार रुपये सांगून त्यापैकी अगोदर घेतलेले ८ हजार रुपये घेतले. नंतर ७ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. याप्रकरणी शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि त्याक बावा हा रंगेहाथ सापडला आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी
श्री. अभिषेक पाटील पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे मो. न.8888881449
सापळा अधिकारी
श्री प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक ला.प्र. वि.धुळे 9657009727
सहा.सापळा अधिकारी
श्री.मंजितसिंग चव्हाण,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.धुळे. 9922447946
सापळा पथक:-
राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागुल ,मकरंद पाटील,प्रविण पाटील,मपोशी गायत्री पाटील,रोहिणी पवार वनश्री बोरसे, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर.
*मार्गदर्शक –
मा.श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर सो. पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र. मो.न. 9371957391
मा.माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि नाशिक
मा.श्री नरेंद्र पवार वाचक,पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि नाशिक परीक्षेत्र. मो. न. 7977847637
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,धुळे.
संतोषी माता चौक धुळे.
दुरध्वनी क्रं. 02562-234020
मोबा.क्रं. 8888881449, 9922447946,9657009727
टोल फ्रि क्रं. 1064