धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुळे मध्यवर्ती बस स्थानकात बसच्या मागील चाकाखाली सापडून एका अज्ञात व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव-नासिक या बसच्या मागील चाकाखाली हा अज्ञात इसम आला.
या दुर्घटनेत व्यक्तीच्या डोक्यावरून ही बस गेली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात अपघातग्रस्त व्यक्तीस ॲम्बुलन्समधून नेण्यात आले.
जळगावहून धुळे मध्यवर्ती बस स्थानकात आलेली बस नाशिकच्या दिशेने निघाली असता बस स्थानकातील एक्झिट गेट जवळ ही घटना झाली.
या घटनेने परिसरात उडाली खळबळ उडाली आहे. या बसच्या मागील चाकाखाली या व्यक्तीने उडी घेत आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
या अज्ञात व्यक्तीची ओळख पटलेली नसून पोलीस प्रशासनातर्फे पुढील तपास सुरू आहे.
Dhule bus accident