धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर महाराष्ट्र लाचखोरीला ऊत आला असून जवळपास दररोज एक लाचखोर अँटी करप्शन ब्युरोच्या गळाला लागत आहे. महावितरण कार्यालयातील वर्ग १ आणि वर्ग २चे अधिकारी एसीबीच्या जाळ्यास सापडले आहेत. अमर अशोक खोंडे (वय ४१ वर्ष, व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, धुळे, रा. प्लॉट नंबर १४ अशोक नगर,जमनागिरी रोड, धुळे) आणि मनोज अरुण पगार (वय ४६ वर्ष, उपव्यवस्थापक वित्त व लेखा विभाग, महावितरण, धुळे, रा.विवेकानंद कॉलनी, करगाव रोड, चाळीसगाव) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
महावितरणच्या एका नोंदणीकृत ठेकेदाराला जिल्हा नियोजन योजनेद्वारे काम मिळाले. धुळे मंडळ कार्यालय अंतर्गत वीज जोडणी संदर्भात २०१८-१९ या वर्षाचा त्याला ठेका मिळाला होता. याअंतर्गत त्याने वीज जोडणी पूर्ण केले. हे काम ५६ लाख ३१ हजार ५९० रुपये एवढ्या किंमतीचे होते. या कामास अनेक वर्षे लोटली तरी त्याचे बील अद्याप मंजूर झाले नाही. यासंर्भात त्याने वारंवार महावितरण कार्यालयात चकरा मारल्या. पण, फायदा झाला नाही. अखेर खोंडे आणि पगार या दोघांनी या बील मंजुरीसाठी तब्बल ५ लाखाची लाच मागितली. तडजोडी अंती अखेर अडीच लाख रुपयांची लाच निश्चित केली. त्यानंतर या प्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला आणि त्यात खोंडे आणि पवार हे दोन लाख रुपये घेताना रंगेहाथ सापडले. आता याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. एसीबी पुढील तपास करीत आहे.
अधिक माहिती अशी
*लाचेची मागणी*-
5,00,000/- रू (पाच लाख रु.)
*तडजोडी अंती लाचेची मागणी-**
2,50,,000/- रू (दोन लाख पन्नास हजार रु.)
*लाच स्वीकारली*-
2,00,00/- रू (दोन लाख रुपये) नमूद रक्कम मागणी केलेल्या एकूण रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून आज रोजी स्वीकारली.
**लाचेची मागणी* –
ता. 8/03/2023
**लाच स्वीकारली*
ता. 8/03/2023
*सापळा अधिकारी*
*अनिल बडगुजर*
पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे
*सहा. सापळा अधिकारी*-
प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.धुळे
*सापळा पथक*:
शरद काटके, संतोष पावरा, भूषण खलाणेकर, भूषण शेटे,गायत्री पाटील, सुधीर मोरे, रामदास बारेला, मकरंद पाटील , प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे.
**मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर*
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र. वि.नाशिक.
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो,धुळे.*
संतोषी माता चौक धुळे.
*@ दुरध्वनी क्रं. 02562-234020*
*@ मोबा.क्रं. 8999962057, 9922447946,9657009727*
*@ टोल फ्रि क्रं. 1064
Dhule ACB Crime Trap Bribe Corruption