नवी दिल्ली – जगात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय वाईट नाही, असे म्हटले जाते. प्रामाणिकपणे आणि सचोटीने कोणताही व्यवसाय केला तर त्यात यश मिळतेच असेही म्हटले जाते. अगदी शेळीपालन पासून ते कुक्कुटपालन पर्यंत सर्वच व्यवसायात जिद्द आणि चिकाटीने काम केले तर नफा मिळतोच. त्यामुळेच पोल्ट्री फार्म व्यवसाय जोरात सुरू असतो, परंतु कोंबडी पालन त्यातही कडकनाथ या प्रकारच्या कोंबडीचे पालन केल्यास आपल्याला खूप फायदा होऊ शकतो, अगदी आपण करोडपती ही बनू शकतो ! असे सांगितल्यास आपणास आश्चर्य वाटेल, परंतु हे खरे आहे कसे काय?
कडाकनाथ कोंबडीचे नाव आपण ऐकले असेलच. त्याचा दर सामान्य कोंबड्यांपेक्षा जास्त आहे. महाग असूनही त्याची मागणी खूप जास्त आहे. तसेच बाजारात खरेदीदारांची कमतरता नाही. हा असा व्यवसाय आहे ज्याला सुरु करण्यासाठी जास्त पैसे किंवा भांडवल लागत नाहीत. यामध्ये छोटी गुंतवणूक करूनही मोठा नफा मिळवता येतो.
कडकनाथ कोंबडी कोणत्या तरी कारणाने नेहमीच चर्चेत असते, करोनाची लागण आणि त्यानंतर बरे झाल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, असा दावा मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने केला होता.
यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला एक पत्र पाठवण्यात आले आहे. यात कडकनाथ कोंबड्यांच्या मांसातून प्रोटीन, विटामिन, झिंक आणि लो फॅट मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे करोना झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर करायला हवे असे सांगण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपल्या फार्म हाऊसमध्ये कडकनाथ कोंबडी पाळतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फारशा गोष्टी लागत नाही, कडकनाथ कोंबडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिला पालन करून तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. तसेच खाद्य म्हणून गवत, भाकरी, तांदूळ, गहू, धान्य, लहान मासे दिले जाऊ शकतात. म्हणजेच चारा खरेदी करण्यासाठीही मोठ्या भांडवलाची गरज भासणार नाही. तसेच ती तयार होण्यासाठी केवळ 90 दिवस लागतात. म्हणजेच, त्यात योग्य नियोजन पद्धतीने गुंतवणूक केली, तर अवघ्या 100 दिवसांत माणूस करोडपती होऊ शकतो.
एका कोंबडीची किंमत सात ते आठशे रुपये असल्याने या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे. कडकनाथ कोंबडीला शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी मागणी आहे. एक किलो चिकन सात ते आठशे रुपयांना मिळते. तर अंड्यालाही मागणी जास्त आहे. एक अंडे 25 रुपयांना विकले जाते. कडकनाथ ही भारतातील एकमेव काळ्या मांसाची कोंबडी आहे. पांढऱ्या चिकनच्या तुलनेत त्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे हृदयरोगी आणि मधुमेही रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे. कोंबडीचे मांस, रक्त, चोच, अंडी, जीभ आणि शरीर सर्व काळे असतात.
कडकनाथ कोंबडी सहा महिन्यांत अंडी घालू लागते. एक कोंबडी एका महिन्यात 12 अंडी घालते. चांगली गोष्ट म्हणजे काळ्या कोंबड्याला रोगाची भीती नसते. कडकनाथ कोंबडीच्या अंड्यांमधूनही प्रोटीन मिळत असल्याच्या दाव्यावर जोर देण्यात आला आहे. मात्र आयसीएमआरने अजूनपर्यंत यावर कोणतही परीक्षण केलेलं नाही. त्यामुळे कडकनाथ कोंबड्यांचा आहारात समावेश करायचा की नाही?, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
कडकनाथ कोंबड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट नसल्याचा दावाही करण्यात आला आहे. हैदराबाद नॅशनल मीट रिसर्च लॅबोरेटरीने याची पुष्टी केली आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी कडकनाथ कोंबड्यांचं मांस योग्य असल्याचा आंतराष्ट्रीय अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यामुळे करोना रुग्णांच्या आहारात कडकनाथ कोंबड्यांचा समावेश करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
साधारण कोंबडीच्या तुलनेत कडकनाथ कोंबड्या आरोग्यपूरक असतात. त्यांचे मांसही रुचकर असते. तसेच कडकनाथची अंडी कमजोरी, दमा, मूत्रपिंडाची सूज, तीव्र डोकेदुखीवर उपचार करण्यासाठी प्रभाविपणे वापरले जाऊ शकते. यामध्ये कोलेस्ट्रॉल मात्रा बाकी पक्ष्यांपेक्षा कमी आहे. वयस्कर लोकांना आणि उच्च रक्तदाब व्यक्तींना ही अंडी खूप पौष्टिक आहे परंतु, काही जण त्या कोंबडीला आणून बंदिस्त जागेत ठेवत आहेत. त्यांना खायला फॅक्टरीमधील अन्न देत आहेत. मात्र औषधी गुणांच्या नावाखाली विकून लोकांची फसवणूक करीत आहेत. मात्र आपण सावधपणे व्यवसाय करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.