नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज दीव्य दरबारात भक्ताचे नाव सांगतात. त्याच्या मनातली प्रश्न स्वतःच जाणतात. दिव्यदृष्टीने आपण हे करीत असल्याचा त्यांचा दावा आहे. पण, मनोविश्लेषकांना त्यात काहीच नवल नाही. माइंड रिडिंगद्वारे समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखता येत असल्याचे आणि हा अगदी वैज्ञानिक प्रकार असल्याचा त्यांचा दावा आहे. अनेक मनोवैज्ञानिक पुढे येऊन ते सिद्धही करून दाखवित आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान देताच धीरेंद्र शास्त्री अचानक प्रकाशझोतात आले आहेत. दिव्यशक्तीवरून दोन्ही पक्षांत शाब्दिक वाद सुरू आहे. त्याचवेळी मनोतज्ज्ञही समोर आले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे ते माइंड रिडिंगग्वारे जाणता येते.
मनातलं कळतं कसं?
मनोवैज्ञानिक आपल्या मेंदूला ताण देऊन समोरच्यांच्या भावना समजतो. काही मनोवैज्ञानिक टेक्निकद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या मेंदूत काय चालले? आहे हे ओळखता येते. मनोवैज्ञानिक त्याला साहनुभूती निकटता असे म्हणतात. समोरच्या व्यक्तिच्या मेंदूत काय चालले याचा थोडाफार अंदाज घेता येतो.
एकाग्रता आवश्यक
माइंड रिडिंग करणारे सातत्याने अभ्यास करून निपूनता साधतात. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा दिवसातून दोन तीन वेळा प्रयत्न करत असतात. निष्णात मनोवैज्ञानिक अगदी समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात सुरू असणारी आकडेमोडही सांगू शकतात. डोक्यातील प्रश्नांची उत्तरे आधिच कादगावर लिहून ठेवणे, मनात सुरू असणारी आकडेमोड, ऐवढेच कशाला स्वतः उत्तर लिहून घेतल्यानंतर समोरच्या व्यक्तिला कोणत्याही क्षेत्राबाबत विचार करण्यास सांगून लिहून ठेवलेल्या उत्तरापर्यंत आणण्याचे कसबही अनेकांना अवगत असतं. समोरच्या व्यक्तीच्या मनातील ऐकण्यासाठी एकाग्रता अधिक महत्त्वाची असते.
संपूर्ण प्रक्रिया विज्ञान आधारित
माइंड रिडिंग विज्ञानावर अवलंबून आहे. मात्र, माइंड रिडिंग विज्ञानासह भावनिकही असते. प्रत्येकवेळी योग्यच माहिती देता येईल असे नाही. माइंड रिडिंग करताना प्रासंगिक गोष्टींवरूनच ती केली जाते.
Dhirendra Shastri Bageshwar Baba Mind Reading Technique