नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धनगर समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर येथे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा पाठींबा देण्यासाठी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथे सकल धनगर बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात पुणे – इंदूर महामार्ग रोखून धरण्यात आला. तर मेंढपाळ मेंढ्या घेऊन रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी संतप्त धनगर समाज बंधावांनीनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धनगर समाजाला तातडीने एस .टी.प्रवर्गाच्या आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली. मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.