विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या कोरोना बाधित झाल्या असून त्याची माहिती त्यांनी स्वतःच ट्वीट करुन दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. तसेच, कोरोनाचा ज्या कुटुंबांवर परिणाम झाला आहे त्यांना मी जवळून पाहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंकजा यांना कोरोनाची बाधा झाल्याची तत्काळ दखल त्यांचे चूलत बंधू धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहीली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई.”
पंकजा यांचे ट्विट
https://twitter.com/Pankajamunde/status/1387631927583145986
धनंजय मुंडे यांची भावनिक पोस्ट अशी
https://www.facebook.com/1454902244739401/posts/2980704572159153/