रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश….

by India Darpan
मार्च 4, 2025 | 9:45 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Dhananjay Munde 2 1140x570 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर दुसरीकडे राजकीय घडामोडींना सुध्दा वेग आला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनजंय मुंडे यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर धनजंय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत होते. त्याचप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. आज मनोज जरांगे यांनी तर फडणवीस व अजीत पवार यांनी त्यांना लाथ मारुन बाहेर काढावं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काल संतोष देशमुख यांच्या हत्येच्या व्हायरल झालेल्या थरारक, भयानक आणि घृणास्पद फोटो आणि व्हिडिओं व्हायरल झाले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एवढं होऊन सुध्दा वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळते असे सांगत संताप व्यक्त केला आहे.

तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, हे फोटो बघून महाराष्ट्र सुन्न झालाय. संतोष देशमुख यांच्या शरीराशी अक्षरशः खेळणाऱ्या या हैवानांना फाशी दिलं तरी ती शिक्षा कमी होईल आणि राक्षसांनाही लाज वाटेल असंच एकंदर हे हत्याकांड आहे. हे रक्तरंजीत फोटो पाहून प्रत्येकाच्या मनात संतापाची त्सुनामी उसळलीय आणि याच संतापातून उद्या महाराष्ट्राच्या भावनेचा उद्रेक झाला तर आश्चर्य वाटणार नाही.

या हत्याकांडात जात आणि धर्माचा काय संबंध? माणुसकी जपण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याने मस्तवाल सरकारला आतातरी जाग येणार का? आणि आरोपींच्या रेंजमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्नही पवार यांनी केला.

तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकारण गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी असतं एवढंच माहित होतं. संतोषअण्णाच्या बाबतीतलं हे क्रौर्य बघितल्यानंतर माणसातल्या गिधाडांना बळ पुरवणारी सत्ता माझ्याकडे नाही याचा आनंद आहे. ही माणसं नाहीत.. आणि यांचं क्रौर्य निमूट पणे सहन करणारे आम्ही तरी कुठे माणसं आहोत? असा प्रश्न केला आहे.

हा सर्व संताप बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाकिस्तानी मुलीच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला रेल्वे कर्मचारी, गुप्तचर यंत्रणेने केली अटक केली

Next Post

अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला राजीनामा…

Next Post
Dhananjay Munde 2 1140x570 1

अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला राजीनामा…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011