इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडच्या प्रकरणात मंत्री धनजंय मुंडे अडचणीत असतांनाच आता वांद्रे फॅमिली कोर्टाने त्यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे. करुणा शर्मा – मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार दिली त्यातील आरोप मान्य करत हा निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयात धनजंय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत निकालाची प्रत पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी.
करुणा, या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.