मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात नााशिक जिल्ह्यातील ५ जागांपैकी ४ जागांवर उमेदवार घोषीत केले. पण, नााशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचे नाव नसल्यामुळे त्या आज आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर पोहचल्या. येथे त्यांनी शक्तीप्रदर्शन करत फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे समर्थक २४ नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.
दुस-या यादीत नाव यावे यासाठी दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. काल जाहीर झालेल्या यादीत नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक पूर्व राहुल ढिकले, बागलाण दिलीप बोरसे, चांदवड डॅा. राहुल आहेर यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली. पण, त्यात फरांदे यांचे नाव नाही. प्रा. फरांदे या दोन वेळेस आमदार झाल्या असून त्या पक्षातील जेष्ठ नेत्या आहे. असे असतांना त्यांचे पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक प्रमाणेच चांदवडमध्ये उमेदवारीवरुन पेच आहे. या मतदार संघातील विदयमान आमदार डॅा. राहुल आहेर यांना उमेदवारी मिळाली आहे. पण, त्यांनी याअगोदरच माघारीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे ते सुध्दा आपले बंधू केदार आहेर यांच्यासोबत फडणवीसांची भेट घेणार आहे.