नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात दोन मोठे नेते माघार घेणार असल्यामुळे भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडणुकीत महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, ते आता आपला नामनिर्देशपत्र माघार घेणार असल्याचे समोर आले आहे.
त्याचप्रमाणे महायुतीत नसले तरी भाजपाला काही मतदार संघात साथ देणारे मनसेचे नेते राज ठाकरे यांनी या मतदार संघातून आपल्या उमेदवाराला माघार घेण्याच्या सुचना दिल्या आहे. त्यामुळे अंकुश पवार हेही माघार घेणार आहे.
नाशिक मध्य या विधानसभा मतदार संघात भाजपच्या देवयानी फरांदे या दोन वेळेस या मतदार संघातून निवडून आल्या आहे. त्यामुळे त्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. या मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला दिलासा मिळाला असला तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी कायम आहे. येथे अपक्ष म्हणून काँग्रेसच्या नेत्या डॅा. हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.