नाशिक- शहरातील डेंगू व चिकनगुनिया यांची साथ नियंत्रित करण्यासाठी नाशिक महानगरपालिके कडून तत्काळ कार्यवाही केली न गेल्यास महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात टाळे ठोकणे भाग पडेल असा इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी आयुक्त नाशिक महानगरपालिका कैलास जाधव यांना निवेदना द्वारे दिलेला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक शहरात धूर फवारणी/ औषध फवारणी ठेकेदार तसेच नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या सदोष कारवाईमुळे डेंगू व डेंगूकार्यवाही बाबत असमाधान व्यक्त केले.
शहरात मोठ्या प्रमाणावर डेंगू चिकनगुनिया चे रुग्ण वाढत असताना नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभाग मात्र निद्रिस्त आवस्थेत असल्याबद्दल मत व्यक्त करताना नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास रुग्णांची संख्या डेंगू व चिकनगुनिया मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या माहित नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना चिकनगुनियाची साथ नियंत्रित करण्यासाठी डेंगू व चिकनगुनिया रुग्णांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन तयार करण्याची मागणी केली, तसेच अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजुला व रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्यात पाणी साठवून डेंग्यूच्या आजाराचा प्रसार होत असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली. तसेच शहरात सफाई करण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवण्याची मागणी केली. शहरात सध्या कार्यरत असणाऱ्या धूर फवारणी/ औषध फवारणी ठेकेदाराकडून योग्य प्रकाराने धूर फवारणी /औषध फवारणी होत नसल्यामुळे हा आजार शहरात फोफावत आहे, त्यामुळे या ठेकेदाराला देण्यात आलेली बेकायदेशीर मुदतवाढ रद्द करून या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी देखील आमदार देवयानी फरांदे यांनी आयुक्त श्री, कैलास जाधव यांचेकडे केली. तसेच धुर फवारणी व औषध फवारणीसाठी नव्याने ठेकेदार नियुक्त करण्याची मागणी देखील आमदार देवयानी फरांदे यांनी केली. महानगरपालिका प्रशासनाकडून याबाबत तत्काळ कारवाई करण्यात न झाल्यास नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला ठोकणे भाग पडेल असा इशारा देखील आमदार देवयानी फरांदे यांनी दिला.