रविवार, डिसेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

चक्क देवाचीच फसवणूक! भक्ताने दान केले ५ कोटींचे बनावट दागिने; अखेर मिळाली ही शिक्षा

सप्टेंबर 18, 2022 | 5:38 am
in संमिश्र वार्ता
0
crime 1234

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात दानशूर मंडळींची कमतरता नाही, देशभरातील अनेक मठ, मंदिरे, धर्मशाळा, तिर्थक्षेत्र, धार्मिक स्थळे यांना दान देणारी अनेक दानशूर मंडळी आहेत. सहाजिकच श्रीमंत देवस्थानच्या दानपेटीत दररोज कोट्यावधींचे दान जमा जमा होत असते. या दानांमध्ये रोख पैशाबरोबरच सोने चांदीचे दागदागिने यांचाही समावेश असतो. परंतु काही वेळा दान देणारे काही भामटे लोक देवाच्या दरबारी देखील चालूपणा करतात असे आढळून आले आहे.

दानपेटीमध्ये जुन्या नोटा टकणे, खोटी नाणी टकणे, चलनात नसलेली किंवा जिर्ण झालेली नाणी व नोटा टाकणे असे प्रकार घडलेल्या आढळून आले आहेत, त्याचप्रमाणे काहींनी खोटे दागिने दान केल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. बिहारमध्ये देखील असाच एक प्रकार नुकताच घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका कथीत दानशूर डॉक्टराने गुरुद्वारामध्ये सोन्याच्या दागदागिन्यांचे दान केले, परंतु हे दान दागिने शुद्ध सोन्याचे नव्हतेच, तर सोन्याचे पॉलिश केलेले होते, असे आढळून आले. हा प्रकार उघडकीस आल्याने संबंधित डॉक्टराला आता गुरुद्वाराच्या मंडळाने शिक्षा फार्मवली आहे.

पाटणा साहिब गुरुद्वारामध्ये एका भक्ताने केलेल्या मोठ्या दानाची चांगलीच चर्चा झाली. त्या भक्ताने 5 कोटी रुपयांच्या हिरे-दागिन्यांसह विविध प्रकारच्या मौल्यवान वस्तू दान केल्या. पण ज्यावेळी त्याने दान केलेले दागिने नकली असल्याचे उघड झाले, त्यावेळी सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. साहिब गुरुद्वारामध्ये ही फसवणूक करणाऱ्या डॉक्टर भक्ताला सर्वांसमोर तीन दिवस भांडी घासण्याची वेगळीच शिक्षा देण्यात आली आहे. या भामट्या भक्ताचा बोगसपणा उघडकीस आल्यानंतर या प्रकारची गंभीर दखल घेण्यात आली.

पाच कोटींच्या दानात भक्ताने दिलेले सगळे दागिने बनावट निघाले. या अनुषंगाने तख्त श्री हरमंदिर पटना साहिबच्या पंच प्यारांची तातडीने बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत नकली दागिने दान करणाऱ्या डॉक्टर भक्ताला चांगलीच शिक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कारवाईत डॉ. सामरा यांना एक अखंड पाठ, ११०० कडधान्य प्रसाद वाटप आणि तीन दिवस भांडी घासण्याचे तसेच भक्तांच्या चप्पला सांभाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तख्त श्री हरमंदिर जी पटना साहिबच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा आरोप आहे. याबद्दल पंच प्यारांनी कठोर कारवाई केली आहे.

गुरुद्वाराच्या संबंधितांनी सांगितले की, पंजाबमधील करतारपूरचे रहिवासी डॉ. गुरविंदर सिंग सामरा यांच्याकडून देणगी घेण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतरही त्यांनी मीडियामध्ये वक्तव्य करून दान दिले. तसेच डॉ. सामरा यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुरुद्वारा साहिबमध्ये सोन्याचे हार, सोन्याने बनवलेले छोटे पलंग आणि सोन्याचे दागिने बनवलेले कलगी दान केले होते. तेव्हाच शीख अनुयायांना या भेटीबद्दल संशय आला. त्यानंतर गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या विरोधी गटाने याबाबत प्रश्न उपस्थित केले.

तख्त श्री हरमंदिर व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत अवतार सिंग हिट यांच्या सूचनेवरून संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यात आली होती, या तपासणीत दागिन्यांमध्ये सोन्याची शुद्धता खूपच कमी असल्याचे आढळून आले. डॉ. सामरा यांच्या आरोपाविरुद्ध जथेदारांनी एफआयआर दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. नवी दिल्लीतील बैठकीला जथेदार आणि डॉ. सामरा उपस्थित होते. येथे तख्त श्री हरमंदिर जी पटना साहिबच्या पंच प्यारा यांनी दोघांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन्ही पक्षांची हजेरी लागल्यानंतर सामरा यांना सदर शिक्षा ठोठावण्यात आली.

Devotee Donate 5 Crore Fake Jewelery Punishment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्याचा रिंगरोड आहे सध्या देशभरात चर्चेत; शेतकऱ्यांना मिळतोय एवढा मोबदला

Next Post

शाळेत लिफ्टमध्ये अडकलेल्या शिक्षिकेचा मृत्यू; असा घडला सर्व प्रकार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

शाळेत लिफ्टमध्ये अडकलेल्या शिक्षिकेचा मृत्यू; असा घडला सर्व प्रकार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011