मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टिव्हीवर रात्री उशीरा सुरू होणाऱ्या देवमाणूस या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. सध्या या मालिकेचा पार्ट २ सुरू आहे. यामध्ये देखील मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर खिळवून ठेवले आहे. या मालिकेतील रंजक वळण असून मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झाले.
विशेष म्हणजे या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून जामकर आणि देवयानीच्या एन्ट्रीनंतर ही मालिका विलक्षण वळणावर आली आहे. जामकरने अजितकुमारला पुरता अडकवलं आहे. त्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अडकण्याचा निश्चय जामकरने केला आहे. त्यासाठी लागणारा सर्व तपास जामकर करतो आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. जामकरच्या पत्नीची आता मालिकेत एन्ट्री होणार आहे.
अभिनेत्री स्नेहल शीदम जामकरच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. जामकरच्या पत्नीच्या एन्ट्रीनंतर मालिकेला काय वळण येणार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना स्नेहल म्हणाली,”देवमाणूस ही मालिका माझी आवडती आहे. या मालिकेत एखादी भूमिका करण्याची इच्छा मला होती पण ती इच्छा आता पूर्ण होत आहे. एका महत्वपूर्ण वळणावर मालिकेत जामकरच्या पत्नीच्या भूमिकेत मी एन्ट्री करणार आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मी अशा करते.”
https://twitter.com/zeemarathi/status/1544576886394593284?s=20&t=nQWUS2tQrikhgeb7-dFklw
‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चर्चा आहे ती या मालिकेतील नव्या पात्राची. आता मालिकेत मार्तंड जामकर यांच्या बायकोनं एन्ट्री घेतली आहे. अभिनेते मिलिंद शिंदे मालिकेत मार्तंड जामकर या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. मार्तंड जामकर याच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री स्नेहल शिदम साकारत आहे. नुकतीच तिची मालिकेत एन्ट्री झाल्याचं प्रेक्षकांना पाहिलंय. ‘चला हवा येऊ द्या’ची ब्लॅक ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्नेहलच्या एन्ट्रीनं मालिकेत नेमका काय ट्वीस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल.
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं निळख मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहल शिदम. ‘ चला हवा येऊ द्या ‘या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली स्नेहल ही लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. अलिकडेच तिने ‘हे तर कायच नाय’ या शो मध्ये हजेरी लावली होती.
दरम्यान, आता नव्या मालिकेत स्नेहल एंट्री करणार असल्यानं ती ‘चला हवा येऊ द्या’मधून ब्रेक घेणार का? असा प्रश्न काही चाहत्यांना पडला आहे. येत्या दिवसांत त्याचंही उत्तर मिळेल. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधून शितल महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. आता ‘देवमाणूस 2’मध्ये ती काय रंगत आणते, ते लवकरच प्रेक्षकांना दिसून येईल.
Devmanus part 2 TV Marathi Serial New Twist New Actress Entry Zee Marathi Entertainment