नाशिक – नाशिकरोड येथील देवळाली गाव परिसरातील सोमवार बाजार येथे अद्ययावत अशी धर्मवीर आनंदराव दिघे व्यायामशाळा उभारणीसाठी आमदार सरोज आहिरे यांच्या प्रयत्नाने तब्बल १ कोटी ५० लक्ष रु. निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. देवळाली गावाला कुस्तीचा जुना इतिहास आहे. या अनुषंगाने आजच्या तरुण पिढी हि ‘आरोग्य हीच संपत्ती ‘ मानून व्यायाम शाळेकडे वळावी तसेच येथील तरुणांची आग्रही मागणी लक्षात घेऊन आमदार आहिरे यांनी राज्य शासनाच्या नगर विकास खात्यामार्फत ‘ महानगर पालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा विकास ‘ या योजनेअंतर्गत आहरीत असलेल्या ३३५ कोटी रुपये निधीतून यांनी देवळाली गावच्या आठवडे बाजार येथे असलेल्या जुन्या व्यायामशाळेच्या विकासासाठी हा निधी उपलध करून देण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच सार्वजनिक बांधकाम खाते व महानगरपालिकेच्या माध्यमातून या कामाला सुरुवात होणार आहे.