देवळाली कॅम्प – देवळाली मतदार संघातील नागरिकांच्या सेवेसाठी १ ऑक्सिजन युनिट असलेली रुग्णवाहिकेचे आमदार सरोज अहिरे यांनी लोकार्पण केली. सौभाग्य नगर परिसरात येथील संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,सोमनाथ बोराडे, मनोहर कोरडे, विष्णुपंत म्हस्के, डॉ. प्रवीण वाघ, विक्रम कोठुळे, रवींद्र धुर्जड,चंद्रकांत साडे, महिंद्र कासार,प्रशांत आवारे, संपत पाळदे,संजय पोरजे, गणेश रिकामे, शुभम कर्डीले, जगदीश शिवदे,अविनाश अरिंगळे यावेळी उपस्थितीत होते. सध्या कोविडचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन देवळालीतील नागरिकांना गरज भासल्यास ७०६६४७१७७७ या क्रमांकावर संपर्क साधत या रुग्णवाहिकेचा लाभ घेता येणार आहे.
गरजूंसाठी ही रुग्णवाहिका
गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांचे कोविड सारख्या संसर्गजन्य आजाराने हाल होत आहेत. त्यामुळे आपण माजी आमदार कै.बाबुलाल सोमा आहेर यांच्या स्मरणार्थ गरजूंसाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली
सरोज अहिरे, आमदार