शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील खंडोबा देवस्थानच्या परिसर विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.
प्रतिजेजूरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानचा यात्रा उत्सव माघी पोर्णीमेला सुरू झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते श्री.खंडोबाची महाआरती करण्यात आली. देवस्थानच्या वतीने स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मदाय आयुक्त सौ.उषा पाटील, संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष सगाजी पावसे, सतिष कानवडे, श्रीराम गणपुले गुलाबराव सांगळे, काशिनाथ पावसे, भिमराज चतर, जावेदभाई जहागिरदार, अमोल खताळ, सोमनाथ दवंगे, किशोर दवंगे व किशोर नावंदर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, या गावाला अध्यात्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात परंतू या तीर्थक्षेत्राची महती अधिक वाढवायची असेल तर या परिसरातील विकासाला गती द्यावी लागेल. त्यामुळे या देवस्थानचा ब वर्गामध्ये समावेश करण्याची ग्वाही देवून तिर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य महामार्गापासून देवस्थानकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देताना या मार्गावरील पुलाच्या कामाला निधी देण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी यावेळी दिले.
यात्रेच्या निमित्ताने हिवरगाव पावसा येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भरविण्यात आलेल्या पशू पक्षी आणि जनावारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. पशुपालकांशी संवाद साधत त्यांनी माहिती जाणून घेतली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
Devgad Khandoba Devasthan Development Fund Minister Vikhe Patil