इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजकीय नेत्यांच्या पत्नी या अनेकदा आणि सामान्यपणे नवऱ्याच्या राजकीय कर्तृत्वामुळे ओळखल्या जातात. त्यातील अनेकांना स्वतःची ओळख असतेच असं नाही. पण मामी अर्थात अमृता फडणवीस त्याला अपवाद आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी असण्यासोबतच अमृता यांची एक स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे. एक गायिका म्हणून त्यांनी आपली ही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नुकतेच त्यांचे एक पंजाबी गाणे प्रदर्शित झाले आहे.
अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. यापूर्वीही त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. नुकतंच त्यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये त्या स्वतः डान्स करतानाही दिसत आहेत. एका दिवसातच या गाण्याला दहा मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. टी सीरिजच्या युट्यूब चॅनलवर अमृता यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, इतर प्रेक्षकांपेक्षा यावर देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं काय आहे, याची लोकांना जास्त उत्सुकता आहे. त्यामुळेच गाण्याच्या लॉंचिंगच्या वेळी अमृता यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हो, पाहिलं. आणि त्यांना हे गाणं खूप आवडल्याचंही त्यांनी सांगितलं. देवेंद्रजींना मुळात गाण्यांची आवड आहे. वेळ मिळेल तेव्हा ते गाणी ऐकत असतात. त्यांना माझी गाणी नेहमीच आवडतात. तसंच हे देखील आवडलं. या गाण्यात तुझा एक वेगळा पैलू दिसतो, असंही त्यांनी मला सांगितल्याचं अमृता सांगतात. दरम्यान, या गाण्यावरून काहींनी अमृता फडणवीस यांना ट्रोलही केलं आहे.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1610910079402016769?s=20&t=lcZGsChIEnDs69APTU1SVQ
याच कार्यक्रमात राजकीय महिलांची किट्टी पार्टी असेल तर तुम्ही कोणाला बोलवाल, असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या की, यात भाजपाच्या महिला नेत्या तर असतीलच पण महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वपक्षीय महिला नेत्यांना आमंत्रित करेन. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
अमृता यांची काही गाणी याआधीही प्रदर्शित झाली आहेत. त्यांच्या या गाण्यांना सोशल मीडियावरही बराच प्रतिसाद मिळाला. तसेच ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
https://twitter.com/fadnavis_amruta/status/1611668779347611652?s=20&t=lcZGsChIEnDs69APTU1SVQ
Devendra Fadnavis Reaction on Amruta Fadnavis New Punjabi Song
Entertainment