नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करु नका, असे कुठेही म्हटले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा कोणाताही संबध नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी त्यांनी तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही मंत्रीमंडळाचा विस्तार लवकर होईल असे पत्रकारांना सांगितले. यावेळी त्यांनी भाजपने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेच्या १६ मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली. या १६ मध्ये बारामतीसह शिंदे यांचा लोकसभा मतदार संघही होता. पण, आता ते बरोबर असल्यामुळे शिंदे गटाचे सर्व खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1556199234122436609?s=20&t=86RUqJE8U96NgVq2DI9rCw