मुंबई – अधिवेशनात सरकारचा चेहरा उघडा पाडणार, सरकार अधिवेशनातून पळ काढतंय, लोकशाहीची थट्टा केली जात आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोन अधिवेशनात दोन राजीनामे झाले. त्यामुळे सरकार आता बचावत्मक पवित्र्यात असल्याचे त्यांनी अधिवेशाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली. महाआघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर शिवसेना – भाजमध्ये शत्रुत्व नव्हते, वैचारिक मतभेद असल्याचेही ते म्हणाले.
ओबीसीला आरक्षण मिळाले नाही तर संन्यास घेईल या घोषणेनंतर खा. संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलतांना ते म्हणाले की, २५ वर्ष मी राजकारण करतो. त्यामुळे संन्यास घेण्याची वेळ येणार नाही. जे करता येईल ते हे सरकार करत नाही, मी जे बोललो ते करण्यासारखे आहे म्हणूनच मी बोललो असेही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने डाटा देण्याची गरज नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी एमपीएसचीच्या विद्यार्थ्यींची आत्महत्या ही गंभीर घटना असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिले. या फेसबुक लिंकवर क्लीक करुन संपूर्ण पत्रकार परिषद बघा….
https://fb.watch/6xqlI9WZky/