मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही असं राज्यपाल कोश्यारी असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहे.
या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधून त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नसल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसांचे कार्य सर्वाधिक आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यावर अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो तसा राज्यपालांनी वापरला. त्यांच्या मनात मराठी माणसांबद्दल श्रद्धा आहे. त्यांना जाणिव आहे की, या देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग सर्वाधिक आहे, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक, मराठीतील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग जास्त आहे. राज्यात उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाची प्रगती लक्षणीय आहे. त्यांचे जगभरात नाव आहे. वेगवेगळ्या समाजाचे योगदान नाकारता येत नाही असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या उभारणीत, विकासात आणि जडणघडणीत मराठी माणसाचे श्रेय सर्वाधिक! उद्योगाच्या जगतात सुद्धा मराठी माणसाची जागतिक भरारी!
मा. राज्यपाल यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही!#Maharashtra pic.twitter.com/cJDDTktQVD— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) July 30, 2022