इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरुन भारतीय जनता पक्षाने त्यांना चांगलेच घेरले आहे. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म या तिन्हीचे रक्षण केले. त्यांच्या देहाचे अक्षरशः तुकडे केले. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच, पण ते धर्मवीर देखील होते. बघा त्यांची सविस्तर प्रतिक्रीयेचा हा व्हिडिओ
छत्रपती संभाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म या तिन्हीचे रक्षण केले.
त्यांच्या देहाचे अक्षरशः तुकडे केले.
म्हणून अजित पवार आणि त्यांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच, पण ते धर्मवीर देखील होते ! pic.twitter.com/W6lRyI2kSV— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 31, 2022
Devendra Fadnavis on Ajit Pawar Sambhaji Maharaj Statement
Politics Controversial