छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. विद्यमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तान मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अशात आता दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जुलैमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मागील महिनाभरापासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या निव्वळ चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची यासंदर्भात भेट घेतली होती. त्यानंतर लगेच विस्तार होईल, असे अपेक्षित होते. परंतु, काहीच झाले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील आमदारांमध्ये नाराजीचा सूर होता. काहींनी ती उघडपणे बोलूनदेखील दाखविली होती. त्यानंतर आता वर्षपूतीच्या निमित्ताने विस्ताराची चर्चा रंगली आहे. त्यावर आता स्वत: फडणवीस बोलले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,‘केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा काही संबंध नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे माहिती नाही, आम्हाला राज्यात अधिक रस आहे. राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासाठी केंद्राची भेट घ्यावी लागते त्याचा पाठपुरावा करावा लागतो या संदर्भातच अनेक बैठक असतात त्यामुळे केंद्र जावे लागते. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आम्हाला देखील करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील मी विश्वासाने सांगतो की जुलै महिन्यामध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.’
शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीदेखील येत्या आठ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढील आठ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार शिरसाट राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठ दिवासांत होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच केंद्रात देखील फेरबदल होणार आहेत. यात शिंदे गटाला दोन मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता सिरसाट व्यक्त केली.