नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत सोहळ्यास ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, किमान आदित्य ठाकरे तरी अभ्यास करून बोलतील, भाषण ऐकून बोलतील. मात्र आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली असून आणि ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे, ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय ? असे त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत त्यात ‘नाणार असो की बारसू असो… भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतं’ असे म्हटले आहे त्यावर यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी सामनामधून भाजपावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आल्याच्या प्रश्नावर फडणवीस यांनी मी सामना वाचत नाही असे एका शब्दात उत्तर दिले.
पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राहुल गांधी प्रकरणावरही भाष्य केले. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं आहे, ते अयोग्य आहे. उच्चपदस्थ लोकांनी असं का म्हणू नये, याबाबत देखील स्पष्टीकरण दिले आहे. अशा प्रकारचा निकाल आल्यानंतर एका गोष्टीचा समाधान आहे की, कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान करत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगलं आणि आमच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट असे चालू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना मदत मिळाली, मोदी आवास योजनेचा अनेकांना लाभ मिळाला, अनेक विधेयक मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
देशातील सगळ्यात मोठा सायबर प्लॅटफॉर्म
महाराष्ट्र पोलीस दल देशातील अतिशय प्रशिक्षित अतिशय शिस्तबद्ध असं पोलीस दल आहे. देशामध्ये आपल्या पोलिस दलाचा एक मोठा नावलौकिक आहे जी काही नवीन युगाची आव्हान काय आहेत, आर्थिक गुन्हेगारी याबाबतची प्रशिक्षण पोलिसांना देत आहोत. नवीन युगाची आव्हाने पेरण्याकरता आपलं पोलीस दल सज्ज असणार आहे देशातला सगळ्यात मोठा सायबर प्लॅटफॉर्म महाराष्ट्रात तयार करत असून आपण एकाच प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया बँकिंग सेक्टर नॉन बँकिंग संघटना असतील सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहार करणाऱ्या आर्थिक संस्था असतील, अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या माध्यमातून सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढता येणार असल्याचं विश्वास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.