नागपूर – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याचे आम्ही समर्थन करत नाही, ते बोलण्याच्या भरात बोलले असतील. मुख्यमंत्री हे महत्त्वाचे पद आहे, त्यामुळे त्या पदाबद्दल बोलत असतांना संयम बाळगणे आवश्यक आहे. भाजप राणेंच्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण, व्यक्तीचे समर्थन करेल, सरकार बेकायदेशीरपणे पोलीसांचा गैरवापर करते आहे, त्यामुळे राणे यांच्या पाठीशी भाजप असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
यावेळी त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांवरही टीका केली आहे, ते म्हणाले की हा अदखलपात्र गुन्हा आहे. याची नोटीस द्यावी लागेल, आयुक्तांचे पत्र वाचले, ते स्वता छत्रपती समजतात का ? पोलीसांचा गैरवापर चाललेला आहे. अख्खे पोलीस फोर्स निघाले आहे. अवैधपणे राणे यांना अटक केली तर जन आशिर्वाद थांबणार नाही. ती सुरुच राहणार आहे. भाजप थांबले नाही, थांबणार नाही असेही त्यांनी सांगितले. आमची यात्रा रोखण्यासाठी ४० एफआर दाखल केले. पण, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांवर एफआयआऱ नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, सरकारला सल्ला आहे की, अशाप्रकराच्या गोष्टी योग्य नाही
यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात त्यामुळे कोणाच्या मनात संताप होवू शकतो, पण, तो निषेध करुन व्यक्त केला जाऊ शकतो असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप पक्षाच्या कार्यालयावर कोणी हल्ला गेला तर ते सहन केले जाणार नाही. आमच्या कार्यालयावर चालून आले, आम्ही लढणारे लोक आहे. त्या त्या पोलीस आय़ुक्तांनी कारवाई केली नाही, तर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करु असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय नेत्यांना निर्लज्ज म्हणतात, कोणी चौकीदार चोर आहे म्हणतात त्यावर गुन्हा दाखल होत नाही ही दुटप्पी भूमिका असू नये, एकच भूमिका असावी असेही ते म्हणाले, जी कारवाई चालली आहे ती अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=375438043982641&id=239595939526679