इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकनाथ शिंदे यांच्या राज्याभिषेकाची घोषणा होताच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला सरकारपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. फडणवीस यांनी मोठे मन दाखवून शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी दिल्याचे मानले जात होते. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारबाहेर राहण्याच्या निर्णयाला भाजप हायकमांड तयार नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. कसेबसे त्यांना शिंदे मंत्रिमंडळात सामील करून घेण्यात आले आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आदेश दिले आहेत की, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, हे आदेश येताच फडणवीसही राजभवनाकडे निघाले असून ते सुद्धा शपथ घेणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे मानले जात होते, परंतु, फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली. शिंदे हे थोड्याच वेळाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शिंदे सरकारला पाठिंबा देईन, पण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, भाजप हायकमांड फडणवीस यांच्या निर्णयाला तयार नाही. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे.
काय म्हणाले जेपी नड्डा?
जेपी नड्डा यांनी ट्विट केले की, “एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांचे अभिनंदन. आज हे सिद्ध झाले आहे की भाजपला मुख्यमंत्रीपदाची कधीच इच्छा नव्हती. नरेंद्र मोदी जी आणि देवेंद्रजींना २०१९ च्या निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी आम्हाला सोडून विरोधकांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले.
https://twitter.com/JPNadda/status/1542497927918104576?s=20&t=Qg6MUXptMrENpkMbCY3u7Q
नड्डा म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी भाजपने एकनाथ शिंदेजींना मोठ्या मनाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. श्री देवेंद्र फडणवीसजींनीही मोठ्या मनाने मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेप्रती त्यांची आपुलकी दिसून येते. कोणतेही पद मिळवणे हे आमचे ध्येय नसून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणे हे आमचे अंतिम ध्येय आहे, हे भाजपने हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.”, असे नड्डा यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/AmitShah/status/1542500419376922625?s=20&t=EoMv8w0zYW47UF0cW1r2Lg
Devendra Fadanvis will be Deputy Chief minister of Maharashtra