मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी राज्य सरकार काय काय करीत आहे याचा पर्दाफाशच फडणवीस यांनी आज विधीमंडळात केला. भाजप नेते गिरीश महाजन यांना मोक्काच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी कसे षडयंत्र रचण्यात आले. महाजनांना ड्रग्ज प्रकरणात गोवण्याचा कसा कट होता यासह अन्य बाबींचे स्टिंग ऑपरेशनच त्यांनी मांडले. विशेष म्हणजे यासंदर्भातील पेनड्राईव्ह सुद्धा त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यामुळे सत्ताधारी सरकारला चांगलेच धारेवर धरत फडणवीस यांनी सभागृह दणाणून सोडले. बघा, त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1501168539515822080?s=20&t=NgAukh4UQZ3gRSoxoXLWxw