मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मी पुन्हा येईन हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा डायलॉग संपूर्ण राज्यात गाजला. अडीच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये मी पुन्हा येईनचा नारा दिला. निवडणूक निकालानंतर मात्र फडणवीस यांना विरोधी पक्षात बसावे लागले आणि ते विरोधी पक्ष नेते बनले. आता शिंदे-फडणवीस सरकार आले असून त्यात फडणवीस यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आले आहे. आज सत्ताधारी सरकारने बहुमत चाचणी सिद्ध केली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी मी पुन्हा आलो आणि इतरांना सोबत घेऊन आलो असे सांगत फडणवीस यांनी चांगलीच फटकेबाजी केली.
बघा त्यांच्या या खुमासदार भाषणाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1543855053470978050?s=20&t=4PCfxSpqwXzgYrtIeLi3qw
Devendra Fadanvis Speech on Punha Yein in Assembly Video